DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?

नेमकं काय घडलं? विकेट वादग्रस्त ठरण्यामागचं कारण काय?

By सुशांत जाधव | Updated: May 6, 2026 13:00 IST2026-05-06T12:54:10+5:302026-05-06T13:00:18+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 DC vs CSK How Did Nitish Rana Get Out? Rules Explained As Fresh Angle Of Dismissal Sparks Row | DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?

DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?

IPL 2026 DC vs CSK How Did Nitish Rana Get Out? Rules Explained : अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्यात नितीश राणाच्या विकेटवरून नवा वाद निर्माण झाला आहे. नूर अहमदच्या गोलंदाजीवर नितीश राणाने डीप फाइन लेगच्या दिशेने स्वीप शॉट खेळला आणि फील्डरने त्याचा झेल टिपला. मात्र या दरम्यान एक विचित्र घटना घडली. झेल होण्याआधीच स्टम्पवरील बेल्स खाली पडल्याचे दिसून आले. त्यामुळे सोशल मीडियावर संभ्रम निर्माण झाला की, ही विकेट वैध आहे की नाही?  बेल्स वाऱ्यामुळे पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मग अंपायरने डेड बॉल न देता नितीश राणाला बाद घोषित का केले? या संपूर्ण प्रकरणात MCC नियमांनुसार निर्णय कसा घेतला जातो, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

नेमकं काय घडलं? कोणत्या कारणामुळे निर्माण झाला वाद?

दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील दहाव्या षटकात चेन्नईकडून नूर अहमद गोलंदाजी करत होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर नितीश राणानं स्वीप शॉट खेळला. डीप फाइन लेगवर कार्तिक शर्मानं त्याचा झेल टिपला. पण हा झेल पूर्ण होण्याआधीच स्टंपवरील बेल्स पडल्या होत्या. जो व्हिडिओ व्हायरल होत आहे ते पाहून नितीश राणा एकाच चेंडूवर हिट विकेट आणि झेलबाद झाल्याची चर्चा रंगत आहे. एवढेच नव्हे तर संजू सॅमसन याने बेल्स पाडल्या का? असा प्रश्नही उपस्थितीत करण्यात आला. पण यापैकी काहीच घडले नाही, ते व्हिडिओत अगदी स्पष्ट दिसते. दिल्लीच्या मैदानात जोरदार वारे वाहत असल्यामुळे स्टंप्सवरील बेल्स पडल्याचा अंदाज आहे. अंपायरने हा डेड बॉल न देता फलंदाजाला बाद कसे ठरवले? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच

फलंदाज हिट विकेट कधी ठरतो?

फलंदाजाने फटका मारताना किंवा धावताना स्टम्पला धक्का दिल्यास तो हिट-विकेट ठरतो. नितीश राणाच्या बाबतीत तसे  घडले नाही. जर यष्टीरक्षकाने झेल घेण्याआधी स्टंपवरील बेल्स पाडल्या असत्या तरी तो नाबाद ठरला असता. पण तसंही काही घडलं नाही.

डेड बॉलचा नियम काय सांगतो?
 
MCC च्या २०.४.२.६ नियमानुसार, जर फलंदाज विचलित झाला असेल किंवा काही अडथळा निर्माण झाला असेल तर डेड बॉल देता येतो. तसेच गोलंदाजाने चेंडू  टाकण्याआधी काही अनपेक्षित घटना घडली तर पंच या परिस्थितीत डेड बॉल घोषित करु शकतो. नितीश राणाच्या प्रकरणात गोलंदाजाने चेंडू टाकल्यावर त्याच्यासमोर कोणताही अडथळा निर्माण झाला नव्हता. त्यामुळे इथं डेड बॉलचा नियम लागू होत नव्हता. त्यामुळे पंचांनी दिलेला निर्णय योग्य ठरतो.
 

Web Title : DC बनाम CSK: नीतीश राणा का विकेट विवाद, अंपायर का फैसला सही?

Web Summary : DC बनाम CSK मैच में नीतीश राणा के विवादास्पद विकेट पर सवाल उठे, क्योंकि कैच से पहले ही बेल्स गिर गई थीं। हवा या अन्य कारणों से अटकलों के बावजूद, MCC नियमों के अनुसार अंपायर का फैसला सही माना गया, क्योंकि गेंद फेंकने से पहले कोई बाधा नहीं आई थी।

Web Title : DC vs CSK: Nitish Rana's dismissal sparks debate; umpire's decision explained.

Web Summary : Nitish Rana's controversial dismissal in the DC vs CSK match raised questions about the validity of the wicket after bails fell before the catch. Despite speculation about wind or other interference, the umpire's decision was deemed correct according to MCC rules, as no obstruction occurred before the ball was bowled.