CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?

दिल्ली कॅपिटल्सच्या संघातील गोलंदाजांसाठी त्याची विकेट घेणं मुश्किलच झाले होते. पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 22:13 IST2026-04-11T22:12:48+5:302026-04-11T22:13:38+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 CSK vs DC Why is Ayush Mhatre Retired Out by Chennai Super Kings vs Delhi Capitals | CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?

CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?

IPL 2026 CSK vs DC Ayush Mhatre Retired Out : चेन्नईतील चेपॉकच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात अंडर १९ वर्ल्ड कप विजेता कर्णधार आयुष म्हात्रे याने दमदार अर्धशतक झळकावले. पहिल्यांदा फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाड स्वस्तात माघारी परतल्यावर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मुंबईकराने ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ३६ चेंडूत ५९ धावांची दमदार खेळी केली. दिल्ली कॅपिटल्सच्या संघातील गोलंदाजांसाठी त्याची विकेट घेणं मुश्किलच झाले होते. पण कडक अर्धशतकी खेळीनंतर तो रिटायर्ड आउट होऊन तंबूत परतल्याचे पाहायला मिळाले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

आयुष म्हात्रेला Retired Out करण्याचा निर्णय खटकणारा; कारण...

चेन्नई सुपर किंग्सच्या संघाचा हा निर्णय सर्वांनाच आश्चर्यचकित करून सोडणारा होता. CSK  च्या संघाच्या या निर्णयामुळे IPL च्या इतिहासात रिटायर्ड आउट होऊन परतणारा तो सहावा फलंदाज ठरला. कडक खेळीसह संघाला मजबूत स्थितीत नेणाऱ्या आयुष म्हात्रेनं संजू सॅमसनच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी ६८ चेंडूत ११३ धावांची दमदार भागीदारी रचली. त्यामुळेच त्याने मैदान सोडणं अनेकांना खटकले आहे. सोशल मीडियावर त्यासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे. 

Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
 
आयुष म्हात्रेवर का आली ही वेळ?

आयुष म्हात्रे हा डेथ ओव्हर्समध्ये मोठे फटके मारणारा फलंदाज नाही. शिवम दुबे ड्रेसिंग रूममध्ये तयार होता. अखेरच्या षटकात मोठ्या फटकेबाजीसह धावगती वाढवण्याच्या इराद्याने हार्ड हिटर आणि फिनिशरची भूमिका बजावण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने त्याच्या जागी दुबेला मैदानात उतरवण्यासाठी म्हात्रेला रिटायर्ड आउट केल्याचे पाहायला मिळाले. दुबेनं १० चेंडूत २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २०० च्या स्ट्राईक रेटनं धावाही केल्या. पण तरीही हा निर्णय काहींना खटकू शकतो. कारण एखाद्या फलंदाजाला रिटायर्ड आउट करणं म्हणझे त्याच्या फटकेबाजीवर भरवसा नसणे असाच होता.


आयुष म्हात्रे आधी या खेळाडूंवर आली रिटायर्ड आउट होण्याची वेळ

  • रविचंद्रन अश्विन – २८ (२३), राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स (वानखेडे स्टेडियम, २०२२) 
  • अथर्व तायडे – ५५ (४२), पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, (धर्मशाळा, २०२३)
  • साई सुदर्शन – ४३ (३१), गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, (अहमदाबाद,२०२३ )
  • तिलक वर्मा – २५ (२३), मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स (लखनऊ २०२५) 
  • डेवॉन कॉनवे – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स (२०२५)

Web Title : CSK vs DC: आयुष म्हात्रे का अर्धशतक, साझेदारी, फिर रिटायर्ड आउट?

Web Summary : चेन्नई बनाम दिल्ली मैच में आयुष म्हात्रे के अर्धशतक और संजू सैमसन के साथ साझेदारी के बाद उनके रिटायर्ड आउट होने से सवाल उठे। शिवम दुबे को डेथ ओवरों में तेजी से रन बनाने का मौका देने के लिए यह फैसला लिया गया, जिसपर बहस छिड़ गई।

Web Title : Ayush Mhatre's fifty, partnership with Samson, retired out: Why?

Web Summary : Ayush Mhatre's solid fifty and partnership with Sanju Samson raised eyebrows when he was retired out in the CSK vs DC match to allow Shivam Dube to accelerate the scoring in death overs. This decision sparked debate.