IPL 2026 : जसप्रीत बुमराहसाठी BCCI चा मेगा प्लॅन! मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढणार?

IPL 2026 मध्ये जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सकडून किती सामने खेळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 13:18 IST2026-03-11T13:13:46+5:302026-03-11T13:18:32+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 Big Blow For Mumbai Indians Jasprit Bumrah is expected to feature more in ODIs than T20Is As Per Indian team management Workload Management | IPL 2026 : जसप्रीत बुमराहसाठी BCCI चा मेगा प्लॅन! मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढणार?

IPL 2026 : जसप्रीत बुमराहसाठी BCCI चा मेगा प्लॅन! मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढणार?

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आता टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत (Jasprit Bumrah) आगामी काळात वनडेला (ODI)  टी-२० पेक्षा अधिक प्राधान्य देण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. ही गोष्ट इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या हंगामाला सुरुवात होण्याआधी मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढवणारी आहे. इथं जाणून घेऊयात BCCI चा  बुमराहसंदर्भातील मेगा प्लॅन आणि त्याचा IPL फ्रँचायझी मुंबई इंडियन्सलावर कसा होऊ शकतो परिणाम? त्यासंदर्भातील सविस्तर माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

बुमराहसंदर्भात खास प्लॅन

जसप्रीत बुमराह हा टीम इंडियाच्या ताफ्यातील प्रमुख गोलंदाज आहे. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने आपल्यातील धमकही दाखवून दिली. आता बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापन बुमराहच्या वर्कलोड (कामाचा) ताण कमी करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर त्याला टी-२० सामन्यातून विश्रांती देत मिशन वनडे वर्ल्ड कपसाठी ताजेतवाणे ठेवण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

कोणाला विश्वास बसेल? शिवम दुबेचा कुटुंबासोबत रेल्वेने प्रवास! टीटीईने विचारले, "क्रिकेटर का?", पत्नीने कसं ...
 
आता मिशन वनडे वर्ल्ड कप! बुमराहला टी-२० मधून विश्रांती?

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसतील. त्यानंतर टीम इंडियाचे वेळापत्रक अधिक व्यग्र आहे. सातत्याने क्रिकेट खेळताना प्रमुख खेळाडूंना दुखापतीचा धोका वाढू शकतो. BCCI बुमराहच्या बाबतीत कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाही. त्यामुळेच त्याचा वर्कलोड मॅनेज करण्यासाठी आगामी काळात त्याला टी-२० क्रिकेटमधून विश्रांती देण्यात येणार आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, बुमराह सध्या सुरू असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील कसोटीसह वनडेवर अधिक फोकस करेल. या परिस्थितीत टी-२० क्रिकेटपासून तो दूर राहू शकतो.

वनडेसह कसोटीला प्राधान्य

बीसीसीआयच्या सूत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार,  "जसप्रीत बुमराहची फिटनेस ही भारताच्या मोठ्या स्पर्धांतील मोहिमेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाला फॉरमॅटला प्राधान्य द्यावे लागेल. टेस्ट क्रिकेट तो खेळणारच आहे, पण ५० षटकांच्या वर्ल्ड कप सायकलमध्ये तो वनडेवर अधिक लक्ष देईल."

 IPL 2026 मध्ये मुंबई इंडियन्सकडून किती सामने खेळणार?

आता बीसीसीआय आणि टीम इंडियाच्या व्यवस्थापनाचा बुमराहच्या वर्कलोडचा प्लॅन मुंबई इंडियन्ससाठी टेन्शन देणारा ठरू शकतो. कारण IPL 2026 च्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून तो किती सामने खेळणार असा एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे. टीम इंडियाप्रमाणेच जगातील सर्वात मोठ्या टी-२० लीगमधील सर्वात यशस्वी मुंबई इंडियन्सचाही बुमराह प्रमुख खेळाडू आहे. याआधीही जसप्रीत बुमराहाच्या वर्कलोड मॅनेजमेंटची कसरत MI ला करावी लागली आहे. या स्पर्धेत बुमराह मर्यादीत सामने खेळणार असेल तर त्याचा वापर कसा करायचा  ते आव्हान MI फ्रँचायझी संघासमोर असेल.

Web Title : बुमराह के लिए बीसीसीआई की मेगा योजना: मुंबई इंडियंस की टेंशन बढ़ी?

Web Summary : बीसीसीआई की योजना है कि बुमराह को टी20 की तुलना में वनडे को प्राथमिकता दी जाए, जिससे 2027 विश्व कप से पहले उनके कार्यभार को प्रबंधित करने के लिए आईपीएल में उनकी भागीदारी सीमित हो सकती है। इस रणनीति से मुंबई इंडियंस के लिए आईपीएल 2026 में बुमराह की उपलब्धता को लेकर चिंता बढ़ गई है, क्योंकि वह फ्रैंचाइजी के लिए एक महत्वपूर्ण खिलाड़ी हैं।

Web Title : BCCI's Mega Plan for Bumrah: Mumbai Indians' Tension Increases?

Web Summary : BCCI plans to prioritize Bumrah for ODIs over T20s, potentially limiting his IPL participation to manage his workload ahead of the 2027 World Cup. This strategy raises concerns for Mumbai Indians regarding Bumrah's availability in IPL 2026, as he is a key player for the franchise.