Join us

IPL 2025 Mumba Indians Video: Tilak Varma ला मैदानाबाहेर पाठवताच Suryakumar Yadav संतापला, अखेर कोचने काढली समजूत

Suryakumar Yadav Angry on Tilak Varma Retired Out, Mumbai Indians IPL 2025 MI vs LSG: तिलक वर्माला अचानक रिटायर्ड आऊट करून मैदानाबाहेर पाठल्यास सूर्यकुमार चिडला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 13:34 IST

Open in App

Suryakumar Yadav Angry on Tilak Varma Retired Out, Mumbai Indians IPL 2025 MI vs LSG: सुरुवातीच्या दोन सामन्यातील पराभवानंतर मुंबई इंडियन्सला गेल्या सामन्यात विजय मिळाला होता. त्यानंतर मुंबई विजयी लयीत परतेल अशी अपेक्षा होती. पण लखनौ विरूद्ध मुंबईला आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबईविरूद्धच्या सामन्यात लखनौने शेवटच्या षटकात चित्तथरारक विजय मिळवला. या सामन्यात लखनौने प्रथम फलंदाजी करताना २००पार मजल मारली. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने २० षटकात केवळ १९१ धावाच केल्या. अखेर लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला १२ धावांनी पराभूत केले. सूर्यकुमार यादवने फटकेबाजी करत ६७ धावा केल्या होत्या. पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला. तिलक वर्माही बराच काळ पिचवर होता, पण त्याला अपेक्षित फटकेबाजी करता आली नाही. शेवटच्या षटकात २४ धावांची गरज असताना अचानक तिलक वर्माला रिटायर्ड आऊट करण्यात आले. त्यावरून सूर्यकुमार यादव नाराज दिसला. त्यानंतर अनेक गोष्टी घडल्या आणि त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला.

नेमके काय घडले?

मुंबईचे पहिले दोन गडी स्वस्तात बाद झाले. नंतर नमन धीर आणि सूर्यकुमार यादव दोघांनी दमदार फलंदाजी केली. नमन धीर ४६ धावांवर तर सूर्याकुमार ६७ धावांवर बाद झाला. सूर्या बाद झाल्यावर, डगआऊटमध्ये जाऊन बसला. नंतर हार्दिक आणि तिलक दोघे खेळत होते. पण तिलक वर्माकडून अपेक्षित फटकेबाजी होत नव्हती. १९ षटकांचा खेळ झाला तरीही त्याला मोठे फटके मारता आले नाही. त्यामुळे अचानक त्याला रिटायर्ड आऊट करून मैदानाबाहेर पाठवण्यात आले.

सूर्यकुमार यादव हा प्रकार पाहून गोंधळला. नंतर त्याच्या चेहऱ्यावर संतापही स्पष्टपणे दिसून आला. कर्णधार हार्दिक मैदानात होता, त्यामुळे त्याने महेला जयवर्धने कडे विचारणा केली. मग जयवर्धनेने त्याची समजूत घालत त्याला प्लॅनिंग समजावून सांगितले. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर सर्व लोक या घटनेवर व्यक्त होताना दिसले.

तिलक वर्माला बाहेर पाठवण्याबद्दल हार्दिक काय म्हणाला?

"तिलक वर्मा बराच काळ मैदानावर खेळत होता. त्याने वेगाने धावा करायचा प्रयत्नही केला. पण शेवटच्या टप्प्यात आम्हाला मोठ्या फटक्यांची गरज होती. पण दुर्दैवाने तिलक वर्माला तसे फटके मारता येत नव्हते. कालचा दिवस त्याचा नव्हता. त्यामुळे त्याच्याबद्दल अशाप्रकारचा निर्णय घ्यावा लागला. आम्हाला कायमच सामना जिंकायचा असतो त्यामुळे असे निर्णय घ्यावे लागतात," असे उत्तर हार्दिक पांड्याने दिले.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५मुंबई इंडियन्सतिलक वर्मासूर्यकुमार अशोक यादवहार्दिक पांड्या