Suryakumar Yadav Most Consecutive Scores of 25 or more In IPL : भारतीय टी-२० संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा स्टार बॅटर सूर्यकुमार यादव आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सातत्याने दमदार खेळी करताना पाहायला मिळत आहे. जयपूरच्या मैदानात रंगलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातही त्याने नाबाद ४८ धावांची खेळी केली. २३ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने त्याने २०८.७० च्या स्ट्राइक रेटनं धावा केल्या. या कामगिरीसह आयपीएलमध्ये त्याने नवा विक्रम सेट केला आहे. आयपीएलच्या इतिहासात सातत्यपूर्ण खेळीसह सलग सर्वाधिक डावात २५ पेक्षा अधिक धावा करण्याचा रेकॉर्ड सूर्यकुमार यादवच्या नावे झालाय. त्याने रॉबिन उथप्पाला मागे टाकले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
..अन् सूर्यानं सेट केला खास विक्रम
राजस्थान विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवनं कर्णधार हार्दिक पांड्याच्या साथीं तिसऱ्या विकेटसाठी ४४ चेंडूत ९४ धावांची दमदार भागीदारी करत संघाच्या धावफलकावर २१७ धावा लावल्या. या सामन्यात २५ पेक्षा अधिक धावा करताच त्याने रॉबिन उथप्पाचा खास विक्रम मागे टाकला. आयपीएलमध्ये सलग ११ सामन्यात सूर्यानं २५ पेक्षा अधिक धावा करण्याचा खास विक्रम प्रस्थापित केला आहे. ११ सामन्यात ४७५ धावांसह राजस्थान विरुद्धच्या सामन्यात सूर्यानं ऑरेंज कॅपही पटकावली आहे.
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
सूर्यकुमार यादवची यंदाच्या हंगामातील कामगिरी
- विरुद्ध राजस्थान रॉयल्स ४८ (२३)
- विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स ५४ (२८)
- विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ४०(१९)
- विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज ३० (६८)
- विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद २६ (१५)
- विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ४०(२८)
- विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु २८ (२६)
- विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स ६७ (४३)
- विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स २७ (९)
- विरुद्ध गुजरात टायटन्स ४८ (२८)
- विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज २९(२६)
११ वर्षे अबाधित होता हा विक्रम
इंडियन प्रीमियर लीगमध्ये हा विक्रम आधी रॉबिन उथप्पाच्या नावे होता. त्याने २०१४ च्या हंगामात सलग १० डावात २५ पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. जवळपास ११ वर्षे अबाधित असलेला हा विक्रम १८ व्या हंगामात मोडीत निघाला आहे. या यादीत स्टीव्ह स्मिथ, विराट कोहली आणि साई सुदर्शन यांचाही समावेश आहे. या तिघांनी सलग ९ डावात २५ पेक्षा अधिक धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
IPL मध्ये सलग अन् सर्वाधिक डावात २५ किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे फलंदाज
- ११ - सूर्यकुमार यादव (२०२५)*
- १०-रॉबिन उथप्पा (२०१४)
- ९-स्टीव्हन स्मिथ (२०१६-१७)
- ९ - विराट कोहली (२०२४-२५)
- ९ - साई सुदर्शन (२०२३-२४)
Web Title: IPL 2025 RR vs MI Suryakumar Yadav Surpasses Robin Uthappa And Virat Kohli to Become Most Consecutive Scores of 25 or more in Indian Premier League
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.