Join us

IPL 2025 : वडिलांचा वारसा जपण्यासाठी आईनं दिलं बळ; आता पाकच्या नाकावर टिच्चून IPL मध्ये रुबाब

या क्रिकेटरच्या इथपर्यंतच्या प्रवासातील यशात त्याच्या आईचाही मोठा वाटा राहिला आहे. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील खास स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 15:02 IST

Open in App

IPL 2025 RR vs MI 50th Match Player to Watch Corbin Bosch Mumbai Indians : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघानं पाकिस्तानच्या नाकावर ठिच्चून दक्षिण आफ्रिकेचा ऑलराउंडर कॉर्बिन बॉश (Corbin Bosch) याला पदार्पणाची संधी दिली. आयपीएलची ऑफर आल्यावर पाकिस्तान सुपर लीगमधून नाव माघार घेत तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाला होता. या निर्णयानंतर पाक क्रिकेट बोर्डानं त्याला नोटीस पाठवली अन् PSL मध्ये त्याच्यावर बंदीची कारवाईही झाली. एका बाजूला हे सगळ घडलं असताना दुसऱ्या बाजूला MI नं खास दिवशी त्याला IPL खेळण्यासाठी संधी दिली. लखनौ विरुद्धच्या सामन्यात त्याने बॅटिंग बॉलिंग दोन्हींत धमक दाखवली. भावाच्या बर्थडे दिवशी हा सामना खेळायला मिळाला, याचा अधिक आनंद वाटतो, ही गोष्ट कॉर्बिन बॉश याने मॅचनंतर बोलून दाखवली होती. या क्रिकेटरचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. वडिलांचा क्रिकेटचा वारसा जपण्यासाठी आई पाठिशी ठाम उभी राहिली. या क्रिकेटरच्या इथपर्यंतच्या प्रवासातील यशात त्याच्या आईचाही मोठा वाटा राहिला आहे. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील खास स्टोरी

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

कॉर्बिन बॉशचे वडील वर्ल्ड कप खेळले अन् भाऊही आहे क्रिकेटर

मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटर कॉर्बन बॉश याचा भाऊ इथन बॉश (Eathan Bosch) हा देखील एक क्रिकेटरच आहे. एवढेच नाही तर या दोघांचे वडील टेर्टियस बॉश यांनी १९९२ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधीत्व केले होते. कॉर्बिन बॉश याने गतवर्षी २२ डिसेंबर २०२४ रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून वनडेत पदार्पण केल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात त्याचा भाऊ इथन बॉश हा वर्ल्ड कप स्पर्धेत वडिलांनी घातलेली जर्सी घालून आपल्या भावाला चीअर करताना दिसला होता. ही गोष्ट दोन्ही भाऊ वडिलांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध असल्याचे चित्र दाखवून दणारे होते. दोन्ही मुलांचे आपल्या आईसोबत स्टाँग बॉडिंग दिसून येते.गंभीर आरोपानंतर आईनं आपल्या दोन्ही मुलांना क्रिकेटरच्या रुपात घडवलं

दक्षिण आफ्रिकेकडून अल्प क्रिकेट कारकिर्दीनंतर दंत चिकित्सकच्या रुपात काम करणाऱ्या टेर्टियस बॉश यांचा २००० मध्ये वयाच्या ३३ व्या वर्षी मृत्यू झाला. मृत्यू मागचं कारण हे गुइलेन बॅरे सिंड्रोम नावाचा दुर्मिळ आजार असल्याचे सांगण्यात आले होते. वडिलांचे निधन झाले त्यावेळी कॉर्बिन फक्त ५ वर्षांचा होता. त्याची आई कैरेन-ऐन बॉश हिने आपल्या दोन्ही मुलांना नवऱ्याप्रमाणे क्रिकेटरच्या रुपात घडवलं. पण तुम्हाला माहितीये का? आपल्या पतीच्या मृत्यूनंतर कैरेन-ऐन बॉश हिच्यावरही गंभीर आरोप झाल्याचे पाहायला मिळाले. टेर्टियस बॉश यांच्या बहिणीने आपल्या भावाच्या मृत्यू संशयास्पद असल्याचा दावा करत न्यायालयात धाव घेतली होती. परिणामी मृत्यूनंतर १८ महिन्यांनी दक्षिण आफ्रिकेचा दिवंगत माजी क्रिकेटर टेर्टियस बॉश याचा मृतदेह थडगे उकरून पुन्हा बाहेर काढण्यात आला. तपासात विषामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मग संशयाची सुईही पत्नीकडे फिरली. कैरेन-ऐन बॉश हिच्या विवाहबाह्य संबंधाशीही हे प्रकरण जोडण्यात आले.  ठोस पुराव्यासह ते सिद्ध झाले नाही. कॉर्बिन बॉशचे वडील आणि  माजी दिवंगत क्रिकेटरच्या मृत्यूचं गूढ आजही कायम आहे.

चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी

 

कणखर मानसिकतेसह बापाचा वारसाचा जपणारा क्रिकेटर 

आयपीएलमध्ये दिमाखदार पदार्पण करणाऱ्या कॉर्बिन बॉश याचा क्रिकेटर होण्याचा प्रवास सहज सोपा नव्हता, हेच या गोष्टीतून दिसून येते. एका बाजूला कुटुंबियात घडलेल्या घटनेची सातत्याने चर्चा होत असताना दुसऱ्या बाजूला वडिलांचे स्वप्न घेऊन क्रिकेटच्या मैदान गाजवणं सोपी गोष्ट नाही. या क्रिकेटरनं कणखर मानसिकतेसह क्रिकेटमधील आपलं कौशल्य विकसित केल्याचे दिसते. आता तो आपल्या भावसह वडिलांकडून लाभलेला क्रिकेटचा वारसा जपताना दिसते.

कशी राहिलीये कॉर्बिन याची आतापर्यंतची क्रिकेट कारकिर्द?

कॉर्बिन याने आतापर्यंत ८६ टी २० सामने खेळले आहेत. यात त्याच्या खात्यात ५९ विकेट्स जमा असून ८१ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. कॉर्बिन हा  २०१४ मध्ये अंडर-१९ वर्ल्ड कप विजेत्या दक्षिण आफ्रिके संघाचा भाग होता. फायनलमध्ये त्याने १५ धावा खर्च करून ४ विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमक दाखवत त्याने गत वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या संघातही स्थान मिळवल्याचे पाहायला मिळाले. २०२२ मध्ये राजस्थानच्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. पण त्यावेळी त्याला पदार्पणाची संधी मिळाली नव्हती. यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सने त्याला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी दिली अन् त्याने त्या संधीच सोनही करून दाखवलं. आयपीएलशिवाय तो दक्षिण आफ्रिकेतील टी-२० लीगमध्ये मुंबई इंडियन्स फ्रँचायझी संघाच्या केप टाउन संघाकडून खेळताना दिसला आहे. गत हंगामात ११ विकेट्स घेत त्याने MI केपटाउन संघाला जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५मुंबई इंडियन्सराजस्थान रॉयल्सइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट