नाबाद ९७ धावांच्या खेळीसह डी’कॉकने केकेआरसाठी रचला विक्रम, राजस्थानविरुद्ध केला असा पराक्रम 

IPL 2025, RR Vs KKR: सलामीवीर क्विंटन डी’कॉकने केलेल्या नाबात ९७ धावांच्या खेळीच्या जोरावर  आयपीएलमध्ये बुधवारी रात्री झालेल्या सामन्यात कोलकाता नाईटरायडर्सने राजस्थान रॉयल्सवर आठ विकेट्स राखून मात केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 12:31 IST2025-03-27T12:30:57+5:302025-03-27T12:31:46+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025, RR Vs KKR: De Kock sets record for KKR with unbeaten 97, achieves feat against Rajasthan | नाबाद ९७ धावांच्या खेळीसह डी’कॉकने केकेआरसाठी रचला विक्रम, राजस्थानविरुद्ध केला असा पराक्रम 

नाबाद ९७ धावांच्या खेळीसह डी’कॉकने केकेआरसाठी रचला विक्रम, राजस्थानविरुद्ध केला असा पराक्रम 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सलामीवीर क्विंटन डी’कॉकने केलेल्या नाबात ९७ धावांच्या खेळीच्या जोरावर  आयपीएलमध्ये बुधवारी रात्री झालेल्या सामन्यात कोलकाता नाईटरायडर्सने राजस्थान रॉयल्सवर आठ विकेट्स राखून मात केली. गतविजेत्या कोलकाता नाईटरायडर्सचा या हंगामातील हा पहिला विजय ठरला आहे. फिरकी गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर कोलकाता नाईटरायडर्सने सुरुवातीला राजस्थानला १५१ धावांवर रोखले. त्यानंतर क्विंटन डीकॉकने केलेल्या नाबाद ९७ धावांच्या जोरावर कोलकात्याने हे आव्हान सहजपणे पार केले. उल्लेखनीय बाब म्हणजे ९७ धावांच्या खेळीदरम्यान, डीकॉकने खास विक्रमही आपल्या नावे केला आहे.

१५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरल्यावर क्विंटन डीकॉकने कोलकाला नाईटरायडर्सला आक्रमक सुरुवात करून दिली. डीकॉकने ६१ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ९७ धावा कुटून काढल्या. डीकॉकने केलेली ९७ धावांची खेळी ही धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईटरायडर्सकडून कुठल्याही फलंदाजाने केलेली ही सर्वोत्तम खेळी ठरली आहे. या बरोबरच डीकॉकने मनीष पांडे याने २०१४ साली पंजाब किंग्सविरोधात धावांचा पाठलाग करताना केलेल्या ९४ धावांच्या खेळीचा विक्रम मोडीत काढला. 

धावांचा पाठलाग करताना केकेआरसाठी करण्यात आलेल्या सर्वोच्च वैयक्तिक धावा 
९७* - क्विंटन डीकॉक, विरुद्ध राजस्थान रॉयल्स २०२५
९४, - मनीष पांडे, विरुद्ध पंजाब किंग्स, २०१४
९३* - ख्रिस लीन, विरुद्ध गुजरात लायन्स, २०१७
९२ - मनविंदर बिसला, विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स, २०१३ 
९०* - गौतम गंभीर, विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, २०१६ 
 

Web Title: IPL 2025, RR Vs KKR: De Kock sets record for KKR with unbeaten 97, achieves feat against Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.