IPL 2025 RR vs CSK : गुवाहटीच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघानं चेन्नई सुपर किंग्जला रोखत यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाडनं अर्धशतक झळकावले. मोक्याच्या क्षणी त्याची विकेट पडल्यावर महेंद्रसिंह धोनीही यावेळी लवकर फलंदाजीसाठी आला, पण रिझल्ट शेवटी राजस्थान रॉयल्सच्या बाजूनेच लागला. धोनी मैदानात आला त्यावेळी चेन्नईच्या संघाला सामना जिंकण्यासाठी १८ चेंडूत ४५ धावांची गरज होती. धोनी आणि जड्डू हा सामना चन्नईच्या बाजूनं फिरवतील, अशा CSK च्या चाहत्यांना आस होती. पण ते शक्य झाले नाही.
लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१८ व्या षटकात एकही मोठा फटका नाही बसला; पण पुढच्या षटकात कुटल्या १९ धावा
अखेरच्या ३ षटकात ४५ धावांची गरज असताना रियान परागनं चेंडू तीक्षणाच्या हाती सोपवला. १८ व्या षटकात महीश तीक्षणानं उत्तम गोलंदाजी केली. त्याने धोनी आणि जडेजाला एकही मोठा फटका मारू दिला नाही. या षटकात त्याने फक्त ६ धावा खर्च केल्या. अखेरच्या दोन षटकात फलंदाजांवरील दबाव वाढला. १२ चेंडूत ३९ धावांची गरज असताना जड्डू आणि धोनी या जोडीनं तुषार देशपांडेच्या १९ व्या षटकात १९ धावा कुटल्या. या षटकातील फटकेबाजीमुळे सामन्यात पुन्हा थोडं ट्विस्ट निर्माण झाले.
Nitish Rana 2nd Joint Fastest Fifty : राणादाची 'रॉयल' खेळी! फिफ्टीनंतर केलेल्या सेलिब्रेशनचीही चर्चा
अखेरच्या षटकात २० धावांची गरज असताना स्ट्राइकवर होता धोनी
अखेरच्या षटकात धोनी स्ट्राइकवर होता अन् चेन्नईच्या संघाला विजयासाठी २० धावांची गरज होती. संदीप शर्मानं पहिलाच चेंडू वाइड टाकला. ही गोष्ट गोलंदाज दबावात असल्याचे संकेतच होते. पण पुढच्याच चेंडूवर धोनीनं मोठा फटका खेळला अन् शिमरॉन हेटमायरनं त्याचा सुरेख झेल टिपला. धोनीची विकेट पडली तिथचं रास्थानच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. नितीश राणाच्या वादळी ८१ धावांच्या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सच्या संघानं निर्धारित २० षटकात १८२ धावा करत चेन्नई सुपर किंग्जसमोर १८२ धावांचे लक्ष ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जचा संघ ६ विकेट्सच्या मोबदल्यात निर्धारित २० षटकात १७६ धावांपर्यंतच मजल मारु शकला.
ऋतुराजची अर्धशतक खेळी ठरली व्यर्थ
धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात खराब झाली. जोफ्रा आर्चरनं रचिन रवींद्रच्या रुपात पहिल्या षटकात चेन्नईला धक्का दिला. जोफ्रानं एक विकेट घेत निर्धाव षटक टाकले. एका बाजूनं ठराविक अंतराने विकेट पडत असताना ऋतुराज गायकवाडने मैदानात तग धरून संघाला विजयाच्या दिशेनं नेले. पण १६ व्या षटकात हसरंगाने त्याची विकेट घेतली आणि सेट झालेला ऋतुराज तंबूत परतल्यामुळे चेन्नईच्या अडचणी वाढल्या. ऋतुराज गायकवाडनं ४४ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ६३ धावांची खेळी केली.
'
Web Title: IPL 2025 RR vs CSK Rajasthan Royals Beats Chennai Super Kings By 6 Runs And Register First Win This Season
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.