IPL 2025 RR vs MI Deepak Chahar Dismissed Vaibhav Suryavanshi on Duck : जयपूरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने आघाडीच्या फलंदाजाच्या जोरावर निर्धारित २० षटकात २ विकेट्स्या मोबदल्यात २१७ धावा करत राजस्थानसमोर २१८ धावांचे टार्गेट सेट केले. या धावांचा पाठलाग करताना वैभव सूर्यंवशीवर पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा होत्या. गुजरात विरुद्ध २०० धावांच्या लढाई विक्रमी शतक झळकावल्यामुळे पुन्हा एकदा १४ वर्षांच्या पोरावर अपेक्षांचे ओझे होते. पण यावेळी त्याला खातेही उघडता आले नाही. दीपक चाहरनं पहिल्याच षटकात त्याची विकेट घेतली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विकेट गमावल्यावर वैभवनं डोळे मिटले अन् कंबरेवर हात ठेवून काहीवेळ स्तब्ध उभा राहिला
वैभव सूर्यंवशी याने दीपक चाहरनं मिडल स्टंप धरून टाकलेला चेंडू मिडऑनच्या दिशेनं टोलवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा हा प्रयत्न फसला. विल जॅक्सनं कोणतीही चूक न करता त्याचा झेल टिपला. झेलबाद झाल्यावर वैभव सूर्यंवशी कंबरेवर हात ठेवून काहीवेळ डोळे मिटून अगदी स्तब्ध उभा राहिल्याचे पाहायला मिळाले. चुकीचा फटका खेळल्याची खंत अन् अपेक्षेला साजेसा खेळी करण्यात आलेले अपयश त्याच्या चेहऱ्यावर दिसून आले.
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
गुजरात विरुद्ध सलामी जोडीनं गाजवलं होतं जयपूरचं मैदान, पण..
वैभव सूर्यंवशी पाठोपाठ यशस्वी जैस्वालनंही काही वेळातच मैदानात सोडल्याचे पाहायला मिळाले. बोल्टनं आपल्या पहिल्या षटकात यशस्वी जैस्वालला बोल्ड केले. तो ६ चेंडूत २ षटकाराच्या मदतीने १३ धावांची खेळी करून तंबूत परतला. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात २०० धावांचा पाठलाग करताना वैभव-यशस्वी जोडीनं पहिल्या विकेटसाठी १६६ धावांची दमदार भागीदारी रचली होती. वैभव सूर्यंवशीनं केलेल्या विक्रमी शतकाच्या जोरावर राजस्थानच्या संघाने १६ व्या षटकातच सामना जिंकल्याचे पाहायला मिळाले. पण मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीसमोर ना विक्रमी शतकवीराचा निभाव लागला ना यशस्वी जैस्वाल फार काळ टिकला.
Web Title: IPL 2025: Record-breaking century-scorer Vaibhav's eyes closed after losing a wicket and...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.