IPL 2025 MI vs PBKS Suryakumar Yadav Record : जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगलेल्या पंजाब विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा स्टार बॅटर सूर्यकुमार यादव याने नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला आहे. भारतीय संघाच्या टी-२० कर्णधाराने सातत्यपूर्ण कामगिरीसह सलग १४ डावात २५ पेक्षा अधिक धावा करत दक्षिण आफ्रिकेच्या टेम्बा बवुमा याचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला. त्याने २०१९-२० या कालावधीत १३ डावात ही कामगिरी करून दाखवली होती. आता सूर्या भाऊनं हा विक्रम आपल्या नावे केलाय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
IPL च्या यंदाच्या हंगामात सूर्याची सातत्यपूर्ण कामगिरी
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सूर्यकुमार यादव पहिल्या सामन्यापासून दमदार कामगिरी करताना दिसतोय. २९, ४८, २७*, ६७, २८, ४०, २६, ६८*, ४०*, ५४, ४८*, ३५, ७३* अशी कामगिरी करत लखनौ विरुद्धच्या सामन्यातच सूर्यानं टम्बा बवुमाची बरोबरी केली होती. पंजाब विरुद्धच्या १४ व्या सामन्यात २५ धावांचा आकडा पार करताच त्याने नवा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला.
"रोहितची बॅटिंग बघून असं वाटतंय की, तो गंभीर अन् गिलला इम्प्रेस करायचा प्रयत्न करतोय"
...अन् टेम्बा बवुमाचा विक्रम मोडला
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा याने २०१९ आणि २०२० मध्ये खेळल्या गेलेल्या १३ टी-२० सामन्यांमध्ये ५२* (३७), १०४* (६३), ४९ (४३), २७* (२३), ३८ (१५), ३३ (२४), ६२ (४२), २७ (३१), ३५ (३०), ३७ (३०), ४३ (२७), ३१ (२९) आणि ४९ (२४) अशी कामगिरी केली होती.
सूर्यानं सचिनचाही विक्रम मोडला
टेम्बा बवुमाचा विक्रम मोडीत काढण्याआधी १८ धावा करताच सूर्यकुमार यादवनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडीत काढला. आता तो मुंबई इंडियन्सकडून एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरलाय. सचिन तेडुंलकरनं २०१० च्या हंगामात MI साठी ६१७ धावा काढल्या होत्या. सूर्यानं हा आकडा पार केला आहे.