Join us

IPL 2025 : ८ मॅच अन् ७ सामनावीर! ना पांड्या ना बुमराह MI च्या ताफ्यातून या गड्यानं दोन वेळा मारली बाजी

या यादीत ना हार्दिक पांड्या ना बुमराह... एक नजर मॅचमध्ये खास छाप सोडत MI कडून सामनावीर पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 12:06 IST

Open in App

आयपीएलच्या १८ व्या हंगामात मुंबई इंडियन्सची सुरुवात अडखळत झाली. यातून सावरत पाच वेळच्या चॅम्पियन संघाने दिमाखात कमबॅक करत प्लेऑफ्स गाठलीये. गुणतालिकेतून चौथ्या क्रमांकावर असूनही हा संघ आता प्लेऑफ्समधील आघाडीच्या दोन स्थानांसाठीच्या शर्यतीत आहे. पंजाब किंग्ज विरुद्धचा सामना जिंकून ते क्वॉलिफायर खेळण्याचा डाव साधणार का? यावर सर्वांच्या नजरा असतील. कारण जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवरील विजेता संघ यंदाच्या हंगामातील टॉप २ मध्ये पोहचणारा पहिला संघ ठरेल. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

८ सामन्यातील विजय अन्  ७ सामनावीर

मुंबई इंडियन्सचा संघ हा एका दोघांवर अवलंबून नाही. आतापर्यंत खेळलेल्या १३ सामन्यातील  ८ सामन्यात विजय मिळवताना ७ खेळाडूंनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलत सामनावीरचा पुरस्कार पटकवलाय. पंजाब विरुद्धच्या सामन्यात MI च्या ताफ्यातून आणखी एका नव्या हिरोचं दर्शन घडणार की, पुन्हा आधी मैदान गाजवलेला गडीच प्रभाव टाकणार तेही पाहण्याजोगे असेल. 

IPL 2025 : प्रीतीच्या पंजाबची मोठी आस; एक नजर त्याच्या खास रेकॉर्डवर

या यादीत ना हार्दिक पांड्या ना बुमराह...

मुंबई इंडियन्सच्या संघाने जे आठ सामने जिंकले आहेत त्यातील ७ सामन्यात वेगवेगळ्या खेळाडूंनी छाप सोडलीये. फक्त एक खेळाडू असा आहे जो दोन सामन्यात सामनावीर ठरलाय. MI कडून सर्वोत्त कामगिरी करून सामनावीर ठरलेल्या खेळाडूंच्या यादीत  कर्णधार हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांची नावे दिसत नाहीत.

कोण आहे तो खेळाडू ज्यानं दोन वेळा मारलीये बाजी

इंग्लंडचा ऑलराउंडर विल जॅक्स (Will Jacks) याने मुंबई इंडियन्सकडून खास छाप सोडल्याचे दिसते. तो दोन वेळा सामनावीर ठरला आहे. LSG विरुद्ध विल जॅक्सनं २१ चेंडूत २९ धावांची उपयुक्त खेळी केल्यावर गोलंदाजीत २ षटकात १८ धावा खर्च करत २ विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात ३ षटकात १४ धावा खर्च करत दोन विकेट्स घेतल्यावर धावांचा पाठलाग करताना २६ चेंडूत ३६ धावांची खेळी केली होती. या दोन्ही सामन्यात तो सामनावीर ठरला. 

याशिवाय या ७ जणांनी सोडली छाप

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांनी पराभवाचा धक्का दिल्यावर कोलकाता विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवला. या पहिल्या विजयात मुंबई इंडियन्सकडून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या अश्वनी कुमार (Ashwani Kumar) याने ४ विकेट्स घेत सामनावीर पुरस्कार पटकवला होता. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ पुन्हा अडखळला. मग दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात संघाने पुन्हा दिमाखात कमबॅक केले. या सामन्यात इम्पॅक्टच्या रुपात गोलंदाजी करताना कर्ण शर्मा (Karn Sharma) याने सामन्याला कलाटणी देत आपली छाप सोडली होती. धावांसाठी संघर्ष करणाऱ्या रोहित शर्मानं (Rohit Sharma) चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध दमदार खेळी करत सामनावीर पुरस्कार पटकावल्याचे पाहायला मिळाले. ट्रेंट बोल्टनं (Trent Boult) सनरायझर्स हैदराबाद,  रायन रिक्लटन (Ryan Rickelton) याने राजस्थान, तर सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामनावीर पुरस्कार पटकवल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५मुंबई इंडियन्सरोहित शर्माहार्दिक पांड्याजसप्रित बुमराहसूर्यकुमार अशोक यादवइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट