IPL 2025 MI vs PBKS 69th Match Player to Watch Marcus Stoinis Punjab Kings : पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील ६९ वा सामना खेळवण्यात येणार आहे. जयपूर येथील सवाई मानसिंह स्टेडियमवर रंगणाऱ्या या लढतीनंतर प्लेऑफ्समधील अव्वल दोनमध्ये कोणता संघ खेळणार ते चित्र स्पष्ट करणारी ठरेल. पंजाब किंग्जच्या संघाने दमदार कामगिरीनंतर मोक्याच्या क्षणी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध नांगी टाकल्यामुळे अव्वल दोनमध्ये स्थान मिळवण्याचा प्रवास खडतर झालाय. मुंबई इंडियन्स विरुद्धचा सामना जिंकून संघ क्वालिफायर १ ची लढत खेळण्यासाठी उत्सुक असेल. हा डाव साधण्यासाठी मार्कस स्टॉयनिसवरही मोठी जबाबदारी असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धमक दिसली, पण त्याची खेळी शेवटी व्यर्थच ठरली
दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात पंजाबची अनकॅप्ड सलामी जोडी स्वस्तात आटोपल्यावर मार्कस स्टॉयनिसने स्फोटक खेळीसह उर्वरित सामन्यासह प्लेऑफ्सच्या लढतीत धमाका करण्यासाठी तयार असल्याचे संकेत दिले होते. मागील सामन्यात त्याने १६ चेंडूत ४४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. एवढेच नाही तर धावांचा बचाव करताना गोलंदाजीतील गणित चुकल्यामुळे शेवटचे षटक टाकण्यासाठी श्रेयस अय्यरनं त्याच्यावरच भरवसा दाखवला होता. हा डाव साध्य झाला नसला तरी बॅटिंगसह बॉलिंगमध्ये संघाला त्याच्याकडून मोठी अपेक्षा असल्याचे दिसते. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात तो संघासाठी सर्वोत्तम योगदान देणार का ते पाहण्याजोगे असेल.
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
स्टॉयनिसची आयपीएलमधील कामगिरी
स्टॉयनिस याने आयपीएलमध्ये आतापर्यंत १०५ सामने खेळले असून त्याच्या खात्यात १९९२ धावांसह ४३ विकेट्स जमा आहेत. यंदाच्या हंगामात त्याने ९ सामन्यात १९३.८५ च्या सरासरीनं १२६ धावा काढल्या आहेत. नाबाद ४४ धावा ही त्याची यंदाच्या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या आहे. गोलंदाजीत मात्र जवळपास १३ षटके टाकूनही त्याच्या हाती विकेट सापडलेली नाही.
IPL कारकिर्दीत एका शतकासह ९ अर्धशतके
मार्कस स्टॉयनिस हा आयपीएलमध्ये शतक झळकवणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. गत हंगामात १० कोटी प्राइज टॅगसह लखनौच्या ताफ्यातून खेळताना त्याने या स्पर्धेत पहिले आणि एकमेव शतक झळकावले होते. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात त्याच्या भात्यातून ६३ चेंडूत १२४ धावांची खेळी आली होती.