मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) चा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने रविवारी वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या लखनौ सुपर जाएंट्स विरुद्धच्या सामन्यात खास विक्रमाला गावसणी घातली. दमदार अर्धशतकासह त्याने आयपीएमध्ये ४,००० धावांचा मैलाचा पल्ला गाठला. तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे.
४००० धावांसह सेट केला नवा विक्रम
सूर्यकुमार यादवने २७१४ चेंडूत चार हजार धावांचा पल्ला गाठत नवा विक्रम सेट केलाय. याआधी हा विक्रम लोकेश राहुलच्या नावे होता. केएल राहुलनं २८२० चेंडूंत ४००० धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमार तिसऱ्या स्थानावर आहे. एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल यांनी २६५८ चेंडूंमध्ये हा टप्पा गाठला होता.
१५० सिक्सरचा पल्लाही केला पार
या सामन्यात त्याने आयपीएलमध्ये १५० षटकार मारण्याचा विक्रमही आपल्या नावे केला. सूर्यकुमार यादवने रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर षटकार मारत आयपीएलमध्ये १५० वा षटकार आपल्या खात्यात जमा केले. लखनौ विरुद्धच्या सामन्यात त्याने २८ चेंडूत १९२.८६ च्या स्ट्राइक रेटनं ५४ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. सिक्सर मारत अर्धशतक साजरे केल्यावर आवेश खानच्या गोलंदाजीवर तो बाद झाला.
सूर्यकुमार यादवसह रायन रिकल्टनच्या भात्यातून आली फिफ्टी
लखनौ विरुद्धच्या सामन्यात रायन रिकल्टन आणि रोहित शर्मानं संघाला दमदार सुरुवात करून दिली. रोहितनं मयंक यादवच्या गोलंदाजीवर दोन कडत षटकार मारले. पण ५ व्या चेंडूवर तो बाद झालाय ३३ धावांवर मुंबई इंडियन्सच्या संघाने रोहितच्या रुपात पहिली विकेट गमावल्यावर रायन रिकल्टनने आपल्या फलंदाजीतील धमक दाखवली. त्याने ३२ चेंडूत ५८ धावांची खेळी करत मुंबई इंडियन्सचा डजाव सावरला. त्यानंतर सूर्यकुमार यादवच्या शतकामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाने लखनौविरुद्धची लढाई २०० पारची केली.