IPL 2025 MI vs LSG : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पहिल्या चार सामन्यात फक्त एक विजय मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सचा संघाने एकदम धमाकेदार कमबॅक केले आहे. वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात लखनौ सुपर जाएंट्सला चारीमुंड्याचित करत मुंबई इंडियन्सच्या संघाने गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतलीये. घरच्या मैदानावर पहिल्यांदा फलंदाजी करताना रायन रिकल्टन आणि सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकासह अन्य फलंदाजांनी केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघाने लखनौ विरुद्धची लढाई २०० पारची केली होती. निर्धारित २० षटकात ७ बाद २१५ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना लखनौचा संघ १६१ धावांत आटोपला. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि विल जॅक्ससह कॉर्बिन बॉशच्या भेदक माऱ्यासमोर लखनौचे फलंदाज हतबल ठरले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
सूर्यकुमार यादव अन् रायन रिकल्टनच्या अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि विल जॅक्ससह कॉर्बिन बॉशचा भेदक मारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 19:47 IST