IPL 2025 : जे घडलं ते विसरुन झहीर अँण्ड कंपनी जम्मू काश्मीरच्या गड्यावर 'भरवसा' कायम ठेवणार की,...

जर संघाने त्याच्यावर डाव खेळला तर यंदाच्या हंगामात त्याच्या भात्यातून पहिली फिफ्टीही पाहायला मिळू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 12:18 IST2025-04-27T12:06:36+5:302025-04-27T12:18:37+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 MI vs LSG 45th Match Lokmat Player to Watch Abdul Samad Lucknow Super Giants | IPL 2025 : जे घडलं ते विसरुन झहीर अँण्ड कंपनी जम्मू काश्मीरच्या गड्यावर 'भरवसा' कायम ठेवणार की,...

IPL 2025 : जे घडलं ते विसरुन झहीर अँण्ड कंपनी जम्मू काश्मीरच्या गड्यावर 'भरवसा' कायम ठेवणार की,...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 MI vs LSG 45th Match Player to Watch Abdul Samad Lucknow Super Giants : इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या हंगामात लखनौचा संघ चांगली कामगिरी करतोय. पण यात आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड्या गड्याचे योगदान मात्र शून्यच. मोठी रक्कम घेऊन LSG च्या नेतृत्वाची जबाबदारी खांद्यावर पडलेला रिषभ पंतनं आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यात फक्त १०६ धावा केल्यात. ६३ धावांची एक खेळी वगळली तर त्याची कामगिरी अगदी शुल्लकच ठरते. लखनौच्या संघाकडून बॅटिंगमध्ये एडन मार्करम, मिचेल मार्श आणि निकोलस पूरन  यांनी धमक दाखवलीये. हे त्रिकूट अपयशी ठरलं तर संघ अडचणीत सापडतो.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

जम्मू काश्मीरच्या गड्यावरील 'भरवसा' कायम राहणार का?

आघाडीच्या फळतील फलंदाजी गडबडली तर पंत संघाला सावरेल, अशी अपेक्षा होती. पण आतापर्यंत एक सामना सोडला तर तो काही ही जबाबदारी पार पाडताना दिसलेला नाही. या परिस्थितीत LSG च्या संघाने नवा प्रयोगही आजमावल्याचे पाहायला मिळाले. जम्मू काश्मीरचा युवा क्रिकेटर अब्दुल समदला दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सान्यात रिषभ पंत आधी बढती मिळाली. पण या सामन्यात वरच्या क्रमांकावर खेळताना धमक दाखवण्यात तो कमी पडला. जे घडलं ते विसरुन हा प्रयोग कायम ठेवत पुढच्या काही सामन्यातही  झहीर अँण्ड कंपनी जम्मूच्या पोरावर भरवसा कायम ठेवणार का? ते पाहण्याजोगे असेल. जर LSG संघाने त्याच्यावर डाव खेळला तर यंदाच्या हंगामात त्याच्या भात्यातून पहिली फिफ्टीही पाहायला मिळू शकते. इथं एक नजर अब्दुल समदच्या आयपीएलमधील कामगिरीवर 

कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”

अब्दुल समदनं पेश केलेला लक्षवेधी खेळीचा नजराणा

  • राजस्थान रॉयल्स विरुद्ध सातव्या क्रमांकावर बॅटिंग करताना १० चेडूंत ३० धावा
  • चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सहाव्या क्रमांकावर बॅटिंग करताना ११ चेंडूत २० धावा
  • पंजाब किंग्ज विरुद्ध सातव्या क्रमांकावर बॅटिंग करताना १२ चेंडूत २७ धावा
  • सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध सातव्या क्रमांकावर बॅटिंग करताना ८ चेंडूत २२ धावा


जम्मू काश्मीरचे मोजकेच खेळाडू IPL मध्ये दिसले. त्यात अब्दुल समदचा लागतो नंबर

उजव्या हाताने फलंदाजीसह गोलंदाजी करण्याची क्षमता असलेला अब्दुल समद याने २०२० च्या हंगामात २० लाख या मूळ किंमतीसह सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएलमध्ये पदार्पण केल्याचे पाहायला मिळाले. परवेझ रसूल आणि रसिख सलाम यांच्यानंतर आयपीएलच्या मैदानात दिसलेला जम्मू काश्मीरचा तिसरा खेळाडू आहे. याशिवाय मंजूर डार हा २०१८ च्या हंगामात पंजाब संघाचा भाग होता. पण त्याला पदार्पणाची संधीच मिळाली नव्हती.

IPL मधील कामगिरी

मागील पाच हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळल्यावर अब्दुल समद आता लखनौच्या ताफ्यातून खेळताना दिसते. LSG च्या संघाने या खेळाडूसाठी ४.२० कोटी एवढी मोठी रक्कम मोजली आहे. IPL च्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याने ५८ सामन्यात ६९० धावा केल्या आहेत. २०२३ आणि २०२४ च्या हंगामात नाबाद ३७ धावांची खेळी ही त्याची आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी आहे. त्याच्या भात्यातून फिफ्टी आली नसली तरी सहाव्या सातव्या क्रमांकावर कमालीच्या स्ट्राइक रेटनं धावा करत सामन्याला कलाटणी देण्यात उपयुक्त ठरला आहे. यंदाच्या हंगामातही ६ व्या सातव्या क्रमांकावर त्याने खास छाप सोडलीये.  ८ सामन्यात ६ चौकार आणि १० षटकाराच्या मदतीने त्याने १९४.८३ च्या स्ट्राइक रेटनं ११३ धावा कुटल्या आहेत.  
 

Web Title: IPL 2025 MI vs LSG 45th Match Lokmat Player to Watch Abdul Samad Lucknow Super Giants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.