IPL 2025 MI vs GT 56th Match Player to Watch Kagiso Rabada Gujarat Titans : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील ५६ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगणार आहे. मुंबई येथील वानखेडेच्या मैदानात रंगणाऱ्या सामन्याआधी गुजरात टायटन्सच्या संघाला एक मोठा दिलासा मिळालाय. कगिसो रबाडा या सामन्यासाठी उपलब्ध आहे. जवळपास ६ फूट ३ इंच उंची असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या गड्याची छाती तशी ४२ इंचाची. पण MI च्या ताफ्यातील एका दोघांसमोर नव्हे तर चौघांसमोर गोलंदाजी करताना तो ५६ इंचाची छाती घेऊन मिरवतो. कोण आहेत मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील ते फलंदाज ज्यांच्यासमोर रबाडा ठरू शकतो घातक? तेच आपण या लेखाच्या माध्यमातन जाणून घेऊयात.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कोण आहेत ते MI चे स्टार ज्यांच्यासमोर रबाडाचे असेल आव्हान?
मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स दोन्ही संघाच्या खात्यात प्रत्येकी १४-१४ गुण जमा आहेत. पण शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघ मुंबई इंडियन्सच्या तुलनेत एक सामना कमी खेळला आहे. त्यामुळे गुजराती ताफा एक पाऊल पुढे आहे. एवढेच नाही यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात गुजरातच्या संघाने मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्काही दिला होता. या धक्क्यातून सावरत मुंबई इंडियन्सच्या संघाने दमदार कमबॅक कले. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, कर्णधार हार्दिक पांड्यासह विल जॅक्सनं मुंबई इंडियन्सच्या यशात मोलाचा वाटा उचलला आहे. MI च्या याच चार फलंदाजांसमोर रबाडा मोठे आव्हान निर्माण करू शकतो.
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
रोहित-सूर्यासमोर रबाडाचा 'चौकार'; त्यानं हार्दिक जॅक्सलाही दमवलंय
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि विल जॅक्स हे चार फलंदाज म्हणजे मुंबई इंडियन्सचा पॉवर पॅकच. पण या फलंदाजांसमोर रबाडाचा रेकॉर्ड हा MI च्या चाहत्यांना धडकी भरवणारा आहे. रबाडाने रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोघांना प्रत्येकी ४-४ वेळा बाद केले आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याची त्याने तीन वेळा शिकार केली असून विल जॅक्स दोन वेळा रबाडाच्या जाळ्यात फसलाय. ही आकडेवारीमुळेच मुंबई इंडियन्सविरुद्ध रबाडाला गुजरातच्या ताफ्यातून मैदानात उतरवले जाण्याची शक्यता आहे.
कोण दाखवणार '५६ इंचाची छाती'?
यंदाच्या हंगामात रबाडा फक्त दोन सामने खेळला आहे. यात त्याने पंजाब किंग्ज विरुद्ध १ आणि मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याच्या रुपात १ विकेट घेतली होती. ड्रेग्स प्रकरणात दोषी आढळल्यामुळे त्याला आयपीएल स्पर्धा सोडून घरवापसी करावी लागली होती. पण या प्रकरणानंतर पुन्हा मैदानात उतरण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कमबॅक सामन्यात तो MI च्या स्टार्सविरुद्ध ५६ इंचाची छाती दाखवणार की, मुंबईकर त्याच्यासमोर रुबात झाडणार ते पाहण्याजोगे असेल.
Web Title: IPL 2025 MI vs GT 56th Match Lokmat Player to Watch Kagiso Rabada Gujarat Titans
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.