सूर्याचा मोठा पराक्रम! टी-२० त असा पराक्रम करणारा पहिला भारतीय; वर्ल्ड रेकॉर्डही टप्प्यात

टी-२० क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय आहे.  एक नजर त्याच्या विक्रमी कामगिरीवर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 23:06 IST2025-05-21T23:05:40+5:302025-05-21T23:06:11+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 MI vs DC Suryakumar Yadav Only Batter Of World Most Consecutive 25 Plus Runs In A Year 2025 | सूर्याचा मोठा पराक्रम! टी-२० त असा पराक्रम करणारा पहिला भारतीय; वर्ल्ड रेकॉर्डही टप्प्यात

सूर्याचा मोठा पराक्रम! टी-२० त असा पराक्रम करणारा पहिला भारतीय; वर्ल्ड रेकॉर्डही टप्प्यात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Suryakumar Yadav World Record in T20s : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील मुंबई येथील वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्ससाठी संकटमोचक म्हणून पुढे आला. त्याने फक्त संघाचा डाव सावरला नाही तर त्याच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर मुंबईकरांनी प्लेऑफ्ससाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सामन्यात दिल्लीकरांसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारली. यंदाच्या हंगामातील १३ व्या सामन्यात सातत्यपूर्ण खेळीचा नजराणा पेश करत त्याने टी-२० क्रिकेटमध्ये  वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केलीये. टी-२० क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय आहे.  एक नजर त्याच्या विक्रमी कामगिरीवर...

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

टी २० क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण २५ पेक्षा अधिक धावांचा रेकॉर्ड

टी २० क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण दमदार कामगिरी करताना सलग १३ सामन्यात २५ किंवा त्यापेक्षा धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड हा टेम्बा बवुमाच्या नावे आहे. सूर्यकुमार यादवने या विक्रमाशी बरोबरी केलीये. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात १३ सामन्यात त्याने हा डाव साधलाय. टेम्बा बवुमानं २०१९ ते २०२० या कालावधीत १३ वेळा ही कामगिरी केली होती. सूर्यकुमार यादव क्रिकेट जगतातील एकमेव फलंदाज आहे ज्याने एका वर्षात हा डाव साधलाय. सूर्यकुमार यादवनं आयपीएलच्या यंदाच्या हंगामात प्रत्येक सामन्यात २५ पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी

आता टेम्बा बवुमाच्या वर्ल्ड रेकॉर्डवर नजरा

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने दक्षिण आफ्रिकेच्या टेम्बा बवुमाच्या विक्रमाशी बरोबरी केलीये. पंजाब किंग्ज विरुद्धच्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात २५ धावा केल्या तर तो बवुमाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडू शकतो. तो ज्या फॉर्ममध्ये खेळतोय ते पाहता हा वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या टप्प्यात असल्याचे दिसते. 

Web Title: IPL 2025 MI vs DC Suryakumar Yadav Only Batter Of World Most Consecutive 25 Plus Runs In A Year 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.