IPL 2025 GT vs MI Eliminator Match Player To Watch Kusal Mendis Gujarat Titans : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील प्लेऑफ्समधील एलिमिनेटरच्या लढतीत गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरातच्या इथपर्यंतच्या यशस्वी प्रवासात जोस बटलरची भूमिका महत्त्वपूर्ण राहिलीये. पण नॅशनल ड्युटी बजावण्यासाठी त्याने GT ची साथ सोडलीये. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात त्याची कमी भरून काढण्यासाठी गुजरात टायटन्सच्या संघाने श्रीलंकन कुशल मेंडिसवर डाव खेळलाय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बटलरच्या जागी तोच असेल गुजरात टायटन्सची पहिली पसंती
बटलरच्या जागी विकेट किपर बॅटरच्या रुपात अनुज रावत या भारतीय अनकॅप्ड खेळाडूच्या रुपात गुजरातकडे एक चांगला पर्याय आहे. पण मेंडिसलाच संघ पहिली पसंती देईल, असे दिसते. श्रीलंकन विकेट किपर बॅटर मुंबई इंडिन्स विरुद्धच्या सामन्यात छाप सोडून गुजरातच्या टेन्शनवरची मात्रा ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल. इथं एक नजर टाकुयात त्याच्या टी-२० कारकिर्दीवर
IPL 2025 Eliminator Match: ..अन् MI नं प्लेऑप्समधील मॅचसाठी एका खेळाडूवर केला सव्वा पाच कोटींचा खर्च
इंग्लंड विरुद्ध पदार्पण अन् न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा टी-२० सामना
३० वर्षीय श्रीलंकन विकेट किपर बॅटरनं २०१६ मध्ये इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. जानेवारीत न्यूझीलंड विरुद्धच्या दौऱ्यात तो श्रीलकेकडून अखेरचा टी-२० सामना खेळला आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत ३ सामन्यात त्याने ५८ धावा केल्या होत्या. यात ३६ चेंडूतील ४६ धावांच्या एका दमदार खेळीचा समावेश होता.
PSL मध्ये २०० च्या स्ट्राईक रेटनं कुटल्यात धावा, आता...
आतापर्यंतच्या आपल्या टी-२० कारकिर्दीत कुशल मेंडिसनं ७८ सामन्यातील ७८ डावात १५ अर्धशतकांच्या मदतीने १३१.६९ च्या स्ट्राइक रेटनं १९२० धावा केल्या आहेत. ८६ ही आंतरराष्ट्रीय टी-२० तील त्याची सर्वोच्च खेळी राहिली आहे. कुसल मेंडिस हा स्फोटक अंदाजातील फटकेबाजीसाठीही ओळखला जातो. IPL मध्ये एन्ट्री मारण्याआधी PSL मध्ये तो क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाचा भाग होता. पाकिस्तानी लीगमध्ये पेशावर विरुद्धच्या सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना १४ चेंडूत ३५ धावांची नाबाद खेळी करताना त्याने २५० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढल्याचे पाहायला मिळाले होते. याशिवाय लाहोरविरुद्धच्या सामन्यातही त्याने १४ चेंडूत ३५ धावांची धमाकेदार इनिंग खेळली होती. पाकला ठेंगा दाखवत त्याने आयपीएलला पसंती दिलीये. इथं तो आपली खास छाप सोडण्यासाठी प्रयत्नशील असेल. गुजरातच्या संघाने ७५ लाख रुपयांसह त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे.
Web Title: IPL 2025 GT vs MI Eliminator Match Lokmat Player To Watch Kusal Mendis Gujarat Titans
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.