IPL 2025 GT vs DC 35th Match Player to Watch Sai Kishore Gujarat Titans : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात खास छाप सोडणाऱ्या खेळाडूंच्या यादीत लेफ्ट आर्म स्पिनर रवीश्रीनिवासन साई किशोर हा देखील आघाडीवर असल्याचे दिसते. तमिळनाडू प्रीमीयर लीगमध्ये धमक दाखवणारा हा फिरकीपटू टीम इंडियाकडून खेळला आहे. यंदाच्या हंगामात त्याने ६ सामन्यात १० विकेट्स घेत आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवून दिलीये. जाणून घेऊयात या फिरकीपटूसंदर्भातील खास गोष्टी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
CSK च्या ताफ्यातून IPL मध्ये एन्ट्री, GT च्या संघाकडून मिळाली पदार्पणाची संधी, पण...
आशिया क्रीडा स्पर्धेतील गोल्ड मेडलिस्ट असलेल्या या फिरकीपूटनं चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यातील २०२१ च्या हंगामात आयपीएल पदार्पण केले. पण या हंगामात त्याला एकही संधी मिळाली नव्हती. २०२२ च्या हंगामापासून तो गुजरात टायटन्सच्या ताफ्यातून खेळताना दिसते. देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर आयपीएलमध्ये एन्ट्री मारली होती. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली २०२२ च्या हंगामात त्याला फक्त ५ सामन्यातच संधी मिळाली. गुजरातच्या ताफ्यात नेतृत्वाची खांदे पालट झाल्यावर शुबमन गिलच्या नेतृत्वाखालीही गत हंगामात तो फक्त ५ सामनेच खेळला. पण यंदाच्या हंगामात त्याला प्रत्येक सामन्यात संधी मिळाली अन् तो या संधीच सोनं करून दाखवताना दिसतोय.
MS धोनीनं धुलाई केल्यावर भज्जीचा सल्ला मिळाला अन्...
CSK च्या ताफ्यातून पदार्पण करण्याआधी २०१९ मध्ये तो चेन्नईच्या प्री सीजन कॅम्पचा भाग होता. या शिबिरातील पहिल्या दोन दिवसात त्याने धोनीला गोलंदाजी केली. यावेळी धोनीनं त्याला धु धु धुतले होते. त्यानेवळी हरभजन सिंग ही CSK च्या ताफ्यात होता. त्याने साई किशोरला सल्ला दिला अन् तो त्याच्या कामीही आला. त्यानंतर या गोलंदाजाने धोनीला एकही सिक्सर मारु दिला नव्हता. साई किशोर याने २०१९ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केली होती. १२ सामन्यात २० विकेट्स घेत तो सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता.
साई किशोरची आयपीएलमधील कामगिरी
लेफ्ट आर्म स्पिनर साई किशोर याने आतापर्यंत १६ आयपीएल सामन्यात २३ विकेट्स घेतल्या आहेत. गत हंगामात ३३ धावा खर्च करून घेतलेल्या ४ विकेट्स ही त्याची आयपीएलमधील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. या हंगामात त्याने ५ सामन्यात ७ विकेट्स घेतल्या होत्या. पदार्पणाच्या हंगामात ५ सामन्यात त्याने ६ विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले होते. यंदाच्या हंगामातील त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर प्रत्येक सामन्यात तो गुजरातकडून खेळताना दिसतोय. लखनौ विरुद्धच्या मागच्या सामन्यात १.३ षटकात ३५ धावा खर्च करत तो महागडा ठरला. पण त्याआधी प्रत्येक सामन्यात त्याने विकेट घेतल्याचे पाहायला मिळाले. ६ सामन्यात १० विकेट्स घेताना पंजाब विरुद्धच्या हंगामातील पहिल्या सामन्यात त्याने ३० धावा खर्च करून ३ विकेट्स घेत सर्वोत्तम कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले.