चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या (MI) च्या संघानं इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात मोठा आणि आश्चर्यकारक डाव खेळला. २४ वर्षीय विघ्नेश पुथूरला त्यांनी चेन्नई विरुद्धच्या सामन्यात पदार्पणाची संधी दिली. या युवा खेळाडूनंही आपल्या फिरकीची जादू दाखवून मिळालेल्या संधीच सोन करून दाखवलं. त्याने आपल्या पदार्पणातील सामन्यात पहिल्याच षटकात विकेट घेतली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पदार्पणाच्या सामन्यात लक्षवेधी कामगिरी, पहिल्या तीन षटकात तीन विकेट्स
खास गोष्ट ही की, त्याने सेट झालेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधाराला माघारी धाडले. एवढ्यावरच तो थांबला नाही दुसऱ्या षटकात त्याने धडाकेबाज फलंदाज शिवम दुबेची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. हा सिलसिला तिसऱ्या षटकात कायम ठेवत त्याने सॅम कुरेनचीही विकेट घेतली.
कोण आहे विग्नेश? MI नं लिलावात त्याच्यासाठी किती पैसा मोजलाय?
रोहित शर्माच्या जागी त्याला इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात संधी मिळाली. हा क्रिकेट मूळचा केरळचा आहे. त्याला अद्याप केरळच्या स्थानक क्रिकेटमध्येही पदार्पणाची संधी मिळाली नाही. पण मुंबई इंडियन्सच्या संघानं त्याला हेरलं अन् या पठ्ठ्यानं आपल्यातील धमक दाखवत मैदानही गाजवलं. जेद्दाह येथे झालेल्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सच्या संघानं या खेळाडूला ३० लाख रुपयांसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं होते. हा केरळमधील रिक्षा चालकाचा मुलगा आहे. स्थानिक क्रिकेटमधील एका संघात खेळताना मुंबई इंडियन्सच्या शोध पथकानं या हिऱ्याला हेरलं आहे.
मेगा लिलाव सुरु असताना टेलिव्हिजन सेट केला होता बंद; कारण...
स्थानिक स्तरावरील केरळ प्रीमियर लीगमध्ये खेळताना मुंबई इंडियन्सची या खेळाडूवर नजर पडली. मग त्याला ट्रायलसाठी मुंबईच्या खास शिबिरात बोलवण्यात आले. एवढं सगळं घडलं असलं तरी त्याला संघात घेऊ असं कोणतही आश्वासन देण्यात आलं नव्हते. दुबईत झालेल्या लिवावात त्याने अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीतून त्याने ३० लाख रुपयांसह नाव नोंदणी केली. आपल्यावर कोण का बोली लावेल, असा विचार करून मेगा लिलाव लाइव्ह शो सुरु असताना टेलिव्हिजन सेट बंद केला होता. त्याने आयपीएल लिलाव प्रक्रिया शो पाहणे टाळले होते. मुंबई इंडियन्सच्या संघानं आपल्यावर ३० लाख रूपायांची बोली लावलीये ते त्याला नंतर कळलं होतं.