विराट कोहलीचे 'संथ' शतक व्यर्थ; जॉस बटलरचे शतक अन् संजू सॅमसनच्या फटकेबाजीने RRचा विजयी चौकार

विराटने आयपीएल इतिहासातील सर्वात संथ शतकाचा नकोसा विक्रम नावावर नोंदवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 11:02 PM2024-04-06T23:02:11+5:302024-04-06T23:07:04+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : RR top on the Point table, Virat Kohli's 'slow' century in vain; Jos Buttler, Sanju Samson sealed RR's fourth win | विराट कोहलीचे 'संथ' शतक व्यर्थ; जॉस बटलरचे शतक अन् संजू सॅमसनच्या फटकेबाजीने RRचा विजयी चौकार

विराट कोहलीचे 'संथ' शतक व्यर्थ; जॉस बटलरचे शतक अन् संजू सॅमसनच्या फटकेबाजीने RRचा विजयी चौकार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सचाच दबदबा पाहायला मिळाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी विराट कोहलीने ( Virat Kohli) झळकावलेले शतक व्यर्थ गेले. विराटने आयपीएल इतिहासातील सर्वात संथ शतकाचा नकोसा विक्रम नावावर नोंदवला. याला जॉस बटलर व संजू सॅमसन या जोडीने आक्रमक उत्तर दिले आणि RR ची विजयाची मालिका सलग चौथ्या सामन्यात कायम ठेवली. RCBच्या फलंदाजांचा स्ट्राईक रेट RRच्या फिरकीपटूंनी संथ केला होता, तेच दुसरीकडे RCB च्या गोलंदाजांना संजू व बटलरने चोपून काढले. बटलरने खणखणीत षटकार खेचून शतकही पूर्ण केले आणि राजस्थानच्या विजयावर शिक्कमोर्तबही केले.     

धनश्री नव्हे, तर RR ची नवी 'प्रिटी वूमन' पाहिलीत का? RCB विरुद्धच्या लढतीत तिचीच चर्चा


विराट कोहली ( Virat Kohli) पहिल्या ते शेवटच्या चेंडूपर्यंत उभे राहूनही RCB ला मोठ्या धावा उभारता आल्या नाही. त्याने RR विरुद्ध शतक झळकावले आणि हे त्याचे आयपीएलमधील ८ व ट्वेंटी-२०तील एकंदर नववे शतक ठरले. विराट व फॅफ ड्यू प्लेसि यांच्या १२५ धावांच्या सलामीने दमदार सुरुवात करून दिली. फॅफ ३३ चेंडूंत ४४ धावांवर बाद झाला. ग्लेन मॅक्सवेल ( १) पुन्हा फेल गेला आणि पदार्पणवीर सौरव चौहान ( ९ ) मोठी खेळी नाही करू शकला. विराटने ६७ चेंडूंत शतक झळकावले आणि हे आयपीएलमधील संथ शतक ठरले. विराट ७२ चेंडूंत १२ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ११३ धावा केल्या आणि RCB च्या ३ बाद १८३ धावाच झाल्या.


प्रत्युत्तरात RR ला दुसऱ्या चेंडूवर रिसे टॉप्लीने माघारी पाठवले. यशस्वी जैस्वालने ( ०) टोलवलेला उत्तुंग चेंडू ग्लेन मॅक्सवेलच्या हातात सहज विसावला. कर्णधार संजू सॅमसन व जॉस बटलर यांनी RR चा डाव सावरताना ६ षटकांत ५४ धावा फलकावर चढवल्या होत्या. या दोघांनी नंतर धावांचा वेग वाढवला अन् त्यात विराटकडून संजूचा झेल सुटला. बटलरने ३० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि संजूसह दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी पूर्ण केली. पाठोपाठ संजूनेही षटकार खेचून ३३ चेंडूंत फिफ्टी मारली. १५ व्या षटकात १४८ धावांची ( ८६ चेंडू) ही भागीदारी मोहम्मद सिराजने संपुष्टात आणली. संजू ४२ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ६९ धावांवर सीमारेषेवर झेलबाद झाला.  


रियान पराग ( ४) यश दयालच्या गोलंदाजीवर स्वस्तात माघारी परतला. ध्रुव जुरेल ( २) टॉप्लीच्या गोलंदाजीवर आऊट झाला. शिमरोन हेटमायरने ( ११*) सामना संपवला. बटलर ५८ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह १०० धावांवर नाबाद राहिला. राजस्थानने ६ विकेटने हा सामना जिंकला. बटलरने RR ला विजयासाठी १ धाव हवी असताना षटकार खेचून शतक पूर्ण केले. 

Web Title: IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : RR top on the Point table, Virat Kohli's 'slow' century in vain; Jos Buttler, Sanju Samson sealed RR's fourth win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.