IPL 2022 : अंबानींचा थाटच न्यारा!; Mumbai Indians साठी बूक केलं अख्खं हॉटेल, खेळाडू व कुटुबीयांसाठी खास सुविधा, Video 

IPL 2022 – Mumbai Indians IPL 2022: मुंबई इंडियन्सने जिओ वर्ल्ड गार्डन येथे बायो-सिक्यूर मनोरंजन सुविधा तयार केल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 10:04 AM2022-03-21T10:04:13+5:302022-03-21T10:05:03+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022: After booking entire hotel, Mumbai Indians creates 13000 square meter bio secure arena for players families, Video  | IPL 2022 : अंबानींचा थाटच न्यारा!; Mumbai Indians साठी बूक केलं अख्खं हॉटेल, खेळाडू व कुटुबीयांसाठी खास सुविधा, Video 

IPL 2022 : अंबानींचा थाटच न्यारा!; Mumbai Indians साठी बूक केलं अख्खं हॉटेल, खेळाडू व कुटुबीयांसाठी खास सुविधा, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 – Mumbai Indians IPL 2022: इंडियन प्रीमिअर लीगचे सर्वाधिक पाच जेतेपदं  नावावर असलेल्या मुंबई इंडियन्सचे मालकी हक्क भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ति म्हणजेच अंबानी कुटुंबियाकडे आहेत. आयपीएल २०२२साठीमुंबई इंडियन्सच्या खेळाडू व कुटुंबीयांसाठी मुंबईत अख्खं हॉटेल बूक करण्यात आले आहे. स्पर्धा कालावधीत खेळाडू व त्यांच्या कुटुंबीयांना घरचं फिलिंग यावं यासाठी फ्रँचायझीने १३००० स्क्वेअर मीटरवर खास सुविधा उभारल्या आहेत.  

मुंबई इंडियन्सने जिओ वर्ल्ड गार्डन येथे बायो-सिक्यूर मनोरंजन सुविधा तयार केल्या आहेत. जेथे खेळाडू व त्यांचे कुटुंबीय मज्जा मस्ती करू शकतात. मुंबई इंडियन्सचा आयपीएल ऑक्शनमधील सर्वात महागडा खेळाडू इशान किशन ( Ishan Kishan) याने या सुविधांची सफर घडवून आणली आहे.


या मनोरंजन सुविधांमध्ये फुत्साल ग्राऊंड, बॉक्स क्रिकेट, पिकलबॉल कोर्ट, फुट व्हॉलिबॉल आदी खेळाडूंना खेळता येणार आहे. याशिवाय गोल्फ रेंजही आहे, मुलांसाठी किड्स झोन व MI Cafeही आहे.    

मुंबई इंडियन्स २७ मार्चला आयपीएल २०२२मधील पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळणार आहे. आयपीएल २०२०च्या अंतिम सामन्यात रोहितचा मुंबई इंडियन्स व रिषभ पंतचा दिल्ली कॅपिटल्स भिडले होते. मुंबई इंडियन्सला A गटात स्थान दिले गेले असून त्यांच्यासोबत दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे या गटात आहेत. मुंबई इंडियन्सचा संघ कोलकाता, राजस्थान, दिल्ली, लखनौ व चेन्नई यांच्याशी दोनवेळा भिडणार, तर हैदराबाद, बंगळुरू, पंजाब व गुजरात यांच्याविरुद्ध एकच सामना खेळणार आहे.

पाहा व्हिडीओ... 

Web Title: IPL 2022: After booking entire hotel, Mumbai Indians creates 13000 square meter bio secure arena for players families, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.