Join us  

IPL 2021 Remaining Matches : आयपीएलच्या नव्या तारखा आल्या समोर; BCCIचा मास्टर प्लान, विंडीज बोर्डाची साथ!

IPL 2021 Remaining Matches : इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डानं ( ECB) भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील वेळापत्रकात बदल न करण्याच्या घेतलेल्या पवित्र्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाच्या उर्वरित सामन्यांच्या आयोजनाला मोठा धक्का बसला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 5:39 PM

Open in App
ठळक मुद्देआयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांसाठी बीसीसीआयनं तयार केला मास्टर प्लानइंग्लंड क्रिकेट बोर्डानं भारत-इंग्लंड मालिकेत बदल करण्यास दिला नकार

इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डानं ( ECB) भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील वेळापत्रकात बदल न करण्याच्या घेतलेल्या पवित्र्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाच्या उर्वरित सामन्यांच्या आयोजनाला मोठा धक्का बसला. पण, जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या बीसीसीआयनं ( BCCI) मास्टरप्लान तयार केला आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आयपीएलचे उर्वरित सामने याच वर्षी खेळवण्याचा पक्का निर्धार केला आहे. त्यादृष्टीनं बीसीसीआयनं २९ मे रोजी महत्त्वाची बैठक बोलावली आहे आणि त्यात या नव्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. बीसीसीआयच्या मदतीला यावेळी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आल्याचे पाहायला मिळत आहे. ( No change in the Test series between India vs England) 

भारत-इंग्लंड कसोटी मालिके दरम्यान अतिरिक्त दिवस कमी करून वेळापत्रकात बदल केल्यास बीसीसीआयला आयपीएलच्या सामन्यांसाठी पुरेसा वेळ मिळत होता. पण, इंग्लंड क्रिकेट बोर्डानं ही मालिका नियोजीत वेळापत्रकानुसारच होईल, अशी भूमिका घेतल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे नव्या वेळापत्रकासाठी हालचाली सुरू झाल्या. बीसीसीआय आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यासाठी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या ३० दिवसांच्या विंडोचा विचार करत होती. यात त्यांना चार आठवडे मिळणार होते आणि शनिवार-रविवार डबल हेडर सामने खेळवून स्पर्धा पूर्ण करण्याचा विचार सुरू होता.  Zaheer Khan : ८ वर्ष अभिनेत्रीसोबत live-in मध्ये होता झहीर खान, करणार होता लग्न; पण अचानक...!

पण, आता अपडेट्स माहितीनुसार ECBनं नकार दिल्यानं बीसीसीआयनं आयपीएलचे उर्वरित सामने १९ किंवा २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत खेळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. भारत- इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका १४ सप्टेंबरला संपणार आहे आणि लंडनहून खेळाडू थेट UAEत दाखल होतील. Unseen Photo : विराट कोहलीचा गुरूग्राम येथील ८० कोटींचा आलिशान बंगला पाहिलात का?

आता त्यांच्यासमोर कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या ( CPL) वेळापत्रकाची अडचण आहे. कॅरेबियन प्रीमिअर लीगचे ( Caribbean Premier League ) २०२१ मधील पर्व २८ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर या कालावधीत  खेळवण्यात येणार आहे. यात बदल करण्याची विनंती बीसीसीआयकडून केली जाऊ शकते. ( The negotiations will happen to end the CPL early for the players to be available for whole IPL 2021) बीसीसीआयच्या या नव्या तारखांनुसार १० डबल हेडर सामने होतील, ७ दिवस प्रत्येकी एक सामना आणि ४ प्ले ऑफचे सामने होतील. पहिल्या विकेटसाठी चार फलंदाजांची ४०८ धावांची भागीदारी, चौघांचेही शतक; क्रिकेटच्या इतिहासातील अजुबा!

टॅग्स :आयपीएल २०२१बीसीसीआयकॅरेबियन प्रीमिअर लीगसंयुक्त अरब अमिराती