Zaheer Khan : ८ वर्ष अभिनेत्रीसोबत live-in मध्ये होता झहीर खान, करणार होता लग्न; पण अचानक...!

क्रिकेट आणि बॉलिवूड यांचं कनेक्शन फार जूनं आहे. Zaheer Khan was in the live-in with this actress, wants to marry, but then suddenly...

क्रिकेट आणि बॉलिवूड यांचं कनेक्शन फार जूनं आहे. भारताचा माजी गोलंदाज झहीर खान ( Zaheer Khan) यानंही बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे हिच्यासोबत लग्न केलं आणि या राजाराणीचा संसार सुखाचा सुरू आहे.

भारतीय संघातील या माजी जलदगती गोलंदाजानं क्रिकेटच्या मैदानावरही प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दहशत निर्माण केली होती. त्याची आक्रमक स्टाईल, लुक्स व फॅशन स्टाईलमुळे तरुणींही त्याच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यामुळेच क्रिकेट कारकिर्दीत झहीर त्याच्या अफेअर्समुळेही चर्चेत राहिला.

सागरिका घाटगे हिच्याआधी झहीरचे नाव आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं होतं. किस्ना, लक बाई चान्स या चित्रपटात काम करणाऱ्या या अभिनेत्रीसोबत झहीर ८ वर्ष लिव्ह ईन Live In मध्ये होता.

ईशा शरवाणी (Isha Sharvani) असे या अभिनेत्रीचे नाव आहे. झहीर आणि ईशा यांचं प्रेमप्रकरण ८ वर्ष चाललं होतं. दोघंही लिव्ह ईनमध्ये राहत असल्याच्याही बातम्या त्यावेळी प्रसिद्ध झाल्या होत्या. पण, त्यांचे लग्नाचं स्वप्न अपूर्ण राहिले.

२००५मध्ये एका कार्यक्रमात या दोघांची भेट झाली होती. त्यानंतर ओळखीचे रुपांतर मैत्रीत अन् मैत्रीचे प्रेमात झाले. या दोघांनी एकमेकांना प्रपोजही केलं होतं आणि त्यानंतर ८ वर्ष हे नातं टिकलं होतं.

या दरम्यान दोघांना अनेकदा एकत्रही पाहिलं गेलं. तेव्हा झहीर व ईशा हे लग्न करणार, अशा बातम्याही रंगल्या होत्या. या दोघांनी काही वर्षानंतर त्यांचं नातं जगजाहीर केलं होतं. २०११च्या वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान दोघांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या.

२०११च्या वर्ल्ड कपनंतर या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. याबाबत झहीरनं काहीच सांगितलं नसलं तरी ईशानं आजही मी झहीरला चांगला मित्र मानते, असे सांगितले.

झहीरनं आपल्या क्रिकेट कारकिर्दीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी या नात्याला पूर्णविराम लावण्याचा निर्णय घेतल्याच्या, चर्चा तेव्हा रंगल्या होत्या.