Join us  

IPL 2021, Mumbai Indians : मुंबई इंडियन्सला पराभूत करणं अवघड, 'हे' खेळाडू ठरणार ट्रम्प कार्ड; दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी

Indian Premier League 2021 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाला ९ एप्रिलपासून सुरूवात होत आहे, म्हणजे आता अवघे १० दिवस उरले आहेत आणि चाहत्यांना उलटा काऊंटडाऊन सुरूही केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 12:45 PM

Open in App

Indian Premier League 2021 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाला ९ एप्रिलपासून सुरूवात होत आहे, म्हणजे आता अवघे १० दिवस उरले आहेत आणि चाहत्यांना उलटा काऊंटडाऊन सुरूही केला आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( MI vs RCB) यांच्या लढतीनं स्पर्धेला सुरूवात होणार आहे. आतापासूनच यंदाचं जेतेपद कोण जिंकेल, यावर पैज लागताना पाहायला मिळत आहेत आणि नेहमीप्रमाणे मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) हे आघाडीवर आहेत. भारताचे दिग्गज सुनील गावस्कर ( Legendary Indian cricketer Sunil Gavaskar) यांनीही मुंबई इंडियन्सला ( MI) हरवणं अवघड असल्याचे स्पष्ट मत मांडले.  सचिन तेंडुलकर, पठाण बंधू कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर सरकारनं संपूर्ण संघालाच केलं क्वारंटाईन!

पाच वेळा आयपीएल जेतेपद जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात स्टार खेळाडूंचा भरणा आहे, त्यामुळे १४व्या पर्वात त्यांना पराभूत करणे अवघड आहे, असे मत सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले.  मुंबई इंडियन्सनं २०१९ - २०२० अशी सलग दोन वर्ष आयपीएल जेतेपद जिंकली आहेत आणि रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली संघ जेतेपदाची हॅटट्रिक करण्यासाठी सज्ज आहेत. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात रोहित, सूर्यकुमार यादव, इशान शर्मा आणि हार्दिक व कृणाल पांड्या  ( Suryakumar Yadav, Ishan Kishan, and the Pandya brothers – Hardik and Krunal ) हे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. या सर्वांनी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळेच यंदाही MI ही जेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत.  रिषभ पंतकडे रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडण्याची संधी; जाणून घ्या ८ फ्रँचायझींचे कर्णधार अन् त्यांचे वय!

गावस्कर म्हणाले की, मुंबई इंडियन्सला हरवणं अवघड आहे. त्यांचे सर्व खेळाडू फॉर्मात आहेत. इशान किशन व सूर्यकुमार यादव यांनी दमदार कामगिरी केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० व वन डे मालिकेत मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी आपली ताकद दाखवून दिली आहे. सूर्यकुमार यादव, इशान किशन यांच्या पदार्पणानं वाढली मुंबई इंडियन्सची डोकेदुखी; IPL 2022त दोघंही MIकडून खेळू शकणार नाहीत!

मुंबई इंडियन्ससाठी १४व्या पर्वात हार्दिक पांड्या ही सर्वात मोठी जमेची बाजू आहे. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करून तंदुरूस्ती सिद्ध केली आहे. गावस्कर म्हणाले,''हार्दिक पांड्याचे पुनरागमन हे मुंबई इंडियन्ससाठीच नव्हे तर भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाचे आहे. आपण त्याला ९ षटकं फेकताना पाहिली आहेत. याचा अर्थ तो तंदुरुस्त आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठीही तो संघासोबत जाईल, त्याला अजून वेळ आहे. पण, भारतीय क्रिकेटसाठी व MI साठी ही महत्त्वाची गोष्ट आहे.'' खेळाडूंची चूक कॅप्टनला महागात पडणार; तर विराट कोहली, रोहित शर्मा, MS Dhoni यांच्यावर थेट बंदीची कारवाई होणार!

टॅग्स :आयपीएलमुंबई इंडियन्ससुनील गावसकरइशान किशनक्रुणाल पांड्यासूर्यकुमार अशोक यादव