Road Safety World Series : सचिन तेंडुलकर, पठाण बंधू कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर सरकारनं संपूर्ण संघालाच केलं क्वारंटाईन!

Road Safety World Series मध्ये सहभागी झालेल्या सहा संघांवर आता कोरोना संकट ओढावलं आहे. काही दिवसांपासून या स्पर्धेतील विजेत्या इंडियन लिजंड्स (  Indian legends ) संघातील सचिन तेंडुलकर, इरफान पठाण, एस बद्रिनाथ आणि युसूफ पठाण हे चार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 11:13 AM2021-03-31T11:13:38+5:302021-03-31T11:14:06+5:30

whatsapp join usJoin us
Indian legends' positive Covid tests force Sri Lanka government to send their legends into self-quarantine | Road Safety World Series : सचिन तेंडुलकर, पठाण बंधू कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर सरकारनं संपूर्ण संघालाच केलं क्वारंटाईन!

Road Safety World Series : सचिन तेंडुलकर, पठाण बंधू कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर सरकारनं संपूर्ण संघालाच केलं क्वारंटाईन!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Road Safety World Series मध्ये सहभागी झालेल्या सहा संघांवर आता कोरोना संकट ओढावलं आहे. काही दिवसांपासून या स्पर्धेतील विजेत्या इंडियन लिजंड्स (  Indian legends ) संघातील सचिन तेंडुलकर, इरफान पठाण, एस बद्रिनाथ आणि युसूफ पठाण ( Sachin Tendulkar, Irfan Pathan, S Badrinath and Yusuf Pathan) हे चार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर आता याच स्पर्धेत सहभागी झालेल्या श्रीलंका लिजंड्स संघातील खेळाडूंना श्रीलंका सरकरानं सेल्फ क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे.  रिषभ पंतकडे रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडण्याची संधी; जाणून घ्या ८ फ्रँचायझींचे कर्णधार अन् त्यांचे वय!

तेंडुलकर पॉझिटिव्ह असल्याची बातमी सर्वात आधी दिली. त्यानंतर युसूफ पठाण, इरफान पठाण आणि एस बद्रीनाथ यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतची माहिती दिली. "मला सौम्य लक्षणे आढळली असून, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी काळजी घेत आहे. सर्वांनी काळजी घ्या" असं सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे. तसेच सचिनच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीदेखील कोरोना चाचणी केली असून सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.


इंडियन लिजंड्स संघातील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे श्रीलंका सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून या स्पर्धेत सहभागी झालेल्या श्रीलंका लिजंड्स संघाच्या खेळाडूंना सेल्फ क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे. या सर्व खेळाडूंची  RT-PCR टेस्ट होणार आहे. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला तरी त्यांना क्वारंटाईन व्हावे लागेल.   IPL 2021 : खेळाडूंची चूक कॅप्टनला महागात पडणार; तर विराट कोहली, रोहित शर्मा, MS Dhoni यांच्यावर थेट बंदीची कारवाई होणार!

श्रीलंका संघ Sri Lanka Legends - तिलकरत्ने दिलशान ( कर्णधार), उपुल थरंगा, चमारा सिल्वा. चिंथका जयासिंघे, थिलान तुषारा, नुवान कुलसेकरा, रसेल अर्नोल्ड, अजंथा मेंडीस, फरवीज महरूफ, सनथ जयसूर्या, मंजुला प्रसाद, मलिंदा वर्नापुरा, धम्मिका प्रसाद, रंगना हेराथ, चमारा कपुगेदरा, धुलांदना विजेसिंघे
 

Web Title: Indian legends' positive Covid tests force Sri Lanka government to send their legends into self-quarantine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.