IPL 2021, Rishabh Pant : रिषभ पंतकडे रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडण्याची संधी; जाणून घ्या ८ फ्रँचायझींचे कर्णधार अन् त्यांचे वय!

IPL 2021: आयपीएलचा १४ वा मोसम सुरू होण्याआधीच दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals ) संघाचा मोठा धक्का बसला होता. त्यांचा हुकमी एक्का आणि कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) याला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दुखापत झाली आणि त्याला आता आयपीएललाही मुकावे लागणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत IPL 2021त रिषभ पंत ( Rishab Pant) संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. ( Rishabh Pant will be Delhi Capitals Captain for #IPL2021).

इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासात रिषभ पंत हा पाचवा सर्वात युवा कर्णधार ठरला आहे. २३ वर्ष व ६ महिने वय असलेल्या रिषभकडे दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. श्रेयस अय्यरनं २३ वर्ष व ४ महिन्यांचा असताना दिल्लीचे नेतृत्व हाती घेतले होते.

सुरेश रैना ( २३ वर्ष व ३ महिने), स्टीव्ह स्मिथ ( २२ वर्ष व ११ महिने) आणि विराट कोहली ( २२ वर्ष व ६ महिने) हे आयपीएलमधील सर्वाय युवा कर्णधारांमध्ये अव्वल तीन स्थानावर आहेत.

सर्वात युवा कर्णधारांमध्ये रिषभ पंत पाचव्या क्रमांकावर असला तरी त्याच्याकडे रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे. रोहितनं २६ वर्ष व २७ दिवसांचा असताना आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. रिषभला यंदा जेतेपद पटकावून हा विक्रम मोडण्याची संधी आहे.

राजस्थान रॉयल्स - संजू सॅमसन ( २६ वर्ष)

किंग्स इलेव्हन पंजाब - लोकेश राहुल ( २८ वर्ष)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - विराट कोहली ( ३२ वर्ष)

मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा ( ३३ वर्ष)

सनरायझर्स हैदराबाद- डेव्हिड वॉर्नर ( ३४ वर्ष)

कोलकाता नाइट रायडर्स - इयॉन मॉर्गन ( ३४ वर्ष)

चेन्नई सुपर किंग्स - महेंद्रसिंग धोनी ( ३९ वर्ष)

यंदाच्या आयपीएलमधील रिषभ पंत हा सर्वात युवा कर्णधार आहे. ( Rishabh Pant is the youngest captain of 2021 season)

डेव्हिड वॉर्नर व इयॉन मॉर्गन हे दोन परदेशी कर्णधार आहे. ( David Warner and Eoin Morgan the two foreign captains)