IPL 2020 Schedule: KKR, RCBनं जाहीर केलं त्यांचं संपूर्ण वेळापत्रक; जाणून घ्या एका क्लिकवर

इंडियन प्रीमिअर लीग 2020 ला 29 मार्चला सुरुवात होणार आहे. यंदाच्या लीगचा सलामीचा सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात वानखेडे स्टेडियवर होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 11:21 IST2020-02-16T11:20:41+5:302020-02-16T11:21:34+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2020 Schedule: KKR, RCB announce their full schedule for IPL 2020 | IPL 2020 Schedule: KKR, RCBनं जाहीर केलं त्यांचं संपूर्ण वेळापत्रक; जाणून घ्या एका क्लिकवर

IPL 2020 Schedule: KKR, RCBनं जाहीर केलं त्यांचं संपूर्ण वेळापत्रक; जाणून घ्या एका क्लिकवर

इंडियन प्रीमिअर लीग 2020 ला 29 मार्चला सुरुवात होणार आहे. यंदाच्या लीगचा सलामीचा सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात वानखेडे स्टेडियवर होणार आहे. आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक अजून जाहीर झालं नसलं तरी काही संघांनी त्यांच्या सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी आघाडी घेतली आहे.

मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स यांच्यात IPL 2020चा सलामीचा सामना 

मुंबई इंडियन्सचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर, तेंडुलकरच्या बर्थ डेला कोणाशी भिडणार?

कोलकाता नाईट रायडर्सनं यंदा त्यांच्या चमूत बराच बदल केला आहे आणि त्यांना तिसऱ्यांदा आयपीएल जेतेपद पटकावण्याची आशा आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यंदा तरी जेतेपदाचा दुष्काळ संपवेल अशी अपेक्षा आहे. KKR आणि RCB हे यंदाच्या मोसमाची सुरुवात एकमेकांविरुद्ध खेळून करणार आहेत. 31 मार्चला बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. घरच्या मैदानावर RCB दुसरा सामना 7 एप्रिलला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळेल. त्यानंतर 18 एप्रिलला राजस्थान रॉयल्सशी त्यांचा मुकाबला होईल. RCBला गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा सामना 5 एप्रिलला करावा लागणार आहे आणि त्यानंतर 10 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सशी त्यांचा सामना होईल.

KKR घरच्या मैदानावर पहिला सामना 3 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध भिडेल. त्यानंतर 6 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्सशी त्यांचा मुकाबला होईल.  

कोलकाता नाईट रायडर्सचे वेळापत्रक
वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 31 मार्च ( अवे) आणि 10 मे ( होम) 
वि. दिल्ली कॅपिटल्स- 3 एप्रिल ( होम) आणि 19 एप्रिल ( अवे) 
वि. चेन्नई सुपर किंग्स - 6 एप्रिल ( होम) आणि  07 मे ( अवे)
वि. राजस्थान रॉयल्स - 9 एप्रिल ( अवे) आणि 02 मे ( होम)
वि. मुंबई इंडियन्स - 12 एप्रिल ( होम) आणि 28 एप्रिल ( अवे)
वि. सनरायझर्स हैदराबाद - 16 एप्रिल ( अवे) आणि 15 मे ( होम)  
वि. किंग्स इलेव्हन पंजाब - 23 एप्रिल ( होम) आणि 26 एप्रिल ( अवे) 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे वेळापत्रक
वि. कोलकाता नाईट रायडर्स - 31 मार्च ( होम) आणि 10 मे ( अवे) 
वि. सनरायझर्स हैदराबाद - 7 एप्रिल ( होम) आणि 5 मे ( अवे) 
वि. राजस्थान रॉयल्स - 18 एप्रिल ( होम) आणि 25 एप्रिल ( अवे)
वि. दिल्ली कॅपिटल्स - 22 एप्रिल ( होम) आणि 10 एप्रिल ( अवे)
वि. किंग्स इलेव्हन पंजाब - 3 मे ( होम) आणि 14 एप्रिल ( अवे) 
वि. चेन्नई सुपर किंग्स - 14 मे ( होम) आणि 27 एप्रिल ( अवे)
वि. मुंबई इंडियन्स - 17 मे ( होम) आणि 5 एप्रिल ( अवे)

Web Title: IPL 2020 Schedule: KKR, RCB announce their full schedule for IPL 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.