IPL 2020 Schedule: मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स यांच्यात IPL 2020चा सलामीचा सामना 

इंडियन प्रीमिअर लीग 2020 ( आयपीएल 2020) चा उद्धाटनीय सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 10:21 AM2020-02-16T10:21:19+5:302020-02-16T10:52:59+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai Indians to host CSK in IPL 2020 opener on March 29 | IPL 2020 Schedule: मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स यांच्यात IPL 2020चा सलामीचा सामना 

IPL 2020 Schedule: मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स यांच्यात IPL 2020चा सलामीचा सामना 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीग 2020 ( आयपीएल 2020) चा उद्धाटनीय सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. 29 मार्चला वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील वन डे मालिका संपल्यानंतर 11 दिवसांनी आयपीएल 2020 ला सुरुवात होणार आहे. इंडियन प्रीमिअर लीग बाद फेरीचे वेळापत्रक नंतर जाहीर करणार असून अंतिम सामना 24 मे रोजी होणार आहे.

आयपीएलनं अजून याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु काही प्रमुख संघांनी त्यांच्या सामन्यांचे वेळापत्रक सोशल मीडियावर पोस्ट केले. 17 मे रोजी अखेरचा साखळी सामना होणार आहे आणि तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात बंगळुरु येथे होईल. विशेष म्हणजे यंदाच्या आयपीएलमध्ये शनिवारी डबल हेडर सामने होणार नाहीत. त्यामुळे स्पर्धेचा कालावधीही वाढला आहे. गतवर्षी ही स्पर्धा 44 दिवसांत झाली होती, परंतु यंदा 50 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. राजस्थान रॉयल्स संघाचे काही घरचे सामने यंदा गुवाहाटी येथे होणार आहेत. त्यानुसार 5 एप्रिल ( वि. दिल्ली कॅपिटल्स) आणि 9 एप्रिल ( वि. कोलकाता नाइट रायडर्स) हे सामने गुवाहाटी येथे होतील. 

असे आहेत संघ
चेन्नई सुपर किंग्स - महेंद्रसिंग धोनी, फॅफ ड्यु प्लेसिस, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, सुरेश रैना, मुरली विजय, रुतुराज गायकवाड, हरभजन सिंग, इम्रान ताहीर, दीपक चहर, केएम आसीफ, लुंगी एनगीडी, शार्दूल ठाकूर, पियुष चावला, जोश हेझलवूड, किशोरे, ड्वेन ब्राव्हो, केदार जाधव, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, मोनू कुमार, कर्ण शर्मा, सॅम कुरण, नारायणन जगदीसन 

मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, हार्दिक शर्मा, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या,  इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंग, जयंत यादव, अदित्य तरे, अनुकूल रॉय, क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेघन, शेफ्राने रुथरफोर्ड, धवल कुलकर्णी, कोल्टर नील, ख्रिस लीन, सौरभ तिवारी, दिगिजय देशमुख, बलवंत राय, मोहसीन खान.

कोलकाता नाइट रायडर्स- दिनेश कार्तिक, टॉम बँटन, शुबमन गिल, आंद्रें रसेल, हॅरी गर्नी, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, ल्युकी फर्गुसन, नितीश राणा, प्रसिध कृष्णा, रिंकू सिंग, एस वॉरियर, शिवम मावी, सिद्देश लाड, सुनील नरीन, पॅट कमिन्स, इयॉन मॉर्गन, वरुण चक्रवर्थी, राहुल त्रिपाठी, ख्रिस ग्रीन, सिद्धार्थ, प्रविण तांबे, निखिल नाईक

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - एबी डिव्हिलियर्स, देवदत्त पड्डीकल, गुरकीरत सिंग, मोईन अली, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, पार्थिव पटेल, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, विराट कोहली. वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, क्रिस मॉरिस, अॅरोन फिंच, केन रिचर्डसन, डेल स्टेन, उदाना, अहमद, फिलिप, देशपांडे.


दिल्ली कॅपिटल्स - श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शिखर धवन, कागिसो रबाडा, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, आर अश्विन, इशांत शर्मा, अमित मिश्रा, किमो पॉल, एच पटेल, अक्षर पटेल, एस लामिचाने, ए खान, जेसन रॉय, ख्रिस वोक्स, अॅलेक्स केरी, शिमरोन हेटमायर, मोहित शर्मा, तुषार देशपांडे, मार्कस स्टॉयनिस, एल यादव.

सनरायझर्स हैदराबाद - अभिषेश शर्मा, बसील थम्पी, भुवनेश्वर कुमार, बिली स्टॅनलेक, डेव्हीड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, केन विलियम्सन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, रशीद  खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवास्तव गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी नटराजन, विजय शंकर, वृद्धीमान सहा, पियाम गर्ग, विराट सिंग, मिचेल मार्श,  फॅबीयन अॅलन, संदीप बवानका, संजय यादव, अब्दुल समद

राजस्थान रॉयल्स - अंकित राजपूत, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, महिपाल लोम्रो, मनन वोहरा, मयांक मार्कंडे, राहुल टेवाटीया, रियान पराग, संजू सॅमसन, शशांक सिंग, श्रेयस गोपाल, स्टीव्हन स्मिथ, वरुण अॅरोन, रॉबीन उथप्पा, जयदेव उनाडकट, यशस्वी जैस्वाल, कार्तिक त्यागी, अनुज रावत, आकाश सिंग, डेव्हीड मिलर, ओशाने थॉमस, अनिरुद्ध अशोक जोशी, टॉम कुरण, अँड्रे टे.


किंग्स इलेव्हन पंजाब - ख्रिस गेल, मोहम्मग शमी, के गोवथम, लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, मुजीब उर रहमान, निकोलस पूरण, करूण नायर, अर्षदीप सिंग, सर्फराज खान, हार्डस विलजोन, मनदीप सिंग, एम अश्विन, जे सुचिथ, हरप्रीत ब्रार, दर्शन नळकांडे, ग्लेन मॅक्सवेल, शेल्डन कोट्रेल, दीपक हुडा, जेम्स निशॅम, रवी बिश्नोई, इशान पोरेल, ख्रिस जॉर्डन, तरजींदर ढिल्लोन, प्रभसिमरन सिंग.

Web Title: Mumbai Indians to host CSK in IPL 2020 opener on March 29

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.