राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) Indian Premier League ( IPL 2020) च्या रविवारी झालेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) विजयासाठी ठेवलेलं 224 धावांचे लक्ष्य चार विकेट्स व 3 चेंडू राखून पार केले. IPL च्या इतिहासातील ही धावांचा यशस्वी पाठलाग करणारे लक्ष्य ठरले आणि RRनं स्वतःच्याच नावावरील विक्रम मोडला. राहुल टेवाटियानं ( Rahul Tewatia) 18व्या षटकात शेल्डन कोट्रेलच्या गोलंदाजीवर पाच खणखणीत षटकार खेचून सामनाच फिरवला. त्याच्या या फटकेबाजीनं सर्वांची वाहवाह मिळवली. पण, टेवाटिया जेव्हा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला, तेव्हा नेटिझन्सने त्याला ट्रोल केले. समालोचक हर्षा भोगलेने ( Harsha Bhogle) टेवाटिया RRला सामना गमावून देणार, असे ट्विट केले. पण, त्यानंतर जे घडलं, ते सर्वांनीच पाहिलं.
IPL 2020 : संजू सॅमसनला टीम इंडियात स्थान मिळत नाही, ही आश्चर्याची गोष्ट; शेन वॉर्ननं व्यक्त केली खंत
त्याआधी हर्षाने शतकवीर मयांक अग्रवाल आणि लोकेश राहुल यांचे कौतुक केले. त्याने ट्विट केले की,''क्वालिटी बॅटींग... आम्ही 90च्या दशकात जेव्हा शाहजाह येथे क्रिकेट कव्हर करायला जायचो, तेव्हा ग्राऊंड एवढं लहान कधीच वाटलं नाही.''
पण, हर्षा भोगलेच्या ट्विटची महान फलंदाज
सचिन तेंडुलकरनं फिरकी घेतली. सचिन म्हणाला,''कदाचित दुसऱ्या डावात ग्राऊंडचा आकार लहान होत असावा''
दरम्यान, राहुल टेवाटियावरील कमेंटनंतर हर्षाला ट्रोल केले गेले आणि त्यानं त्यांनाही उत्तर दिले.
संजू सॅमसनची मैदानावर आतषबाजी...पण, त्याच्यावरून गौतम गंभीर-शशी थरूर यांच्यात रंगली जुगलबंदी
संजू सॅमसनचा डाएट प्लान कुणी मला सांगेल का? आनंद महिंद्रा यांचं ट्विट व्हायरल
राहुल टेवाटियाचे एका षटकात पाच खणखणीत Six; ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी, Video
राजस्थान रॉयल्सच्या ऐतिहासिक विजयानंतर Point Tableमध्ये मोठे फेरबदल!
हक्कासाठी जाब विचारणाऱ्या राहुल टेवाटियाची IPL 2019 मध्ये रिकी पाँटिंगनं केली होती थट्टा, Video