RR vs KXIP Latest News : संजू सॅमसनचा डाएट प्लान कुणी मला सांगेल का? आनंद महिंद्रा यांचं ट्विट व्हायरल

RR vs KXIP : शारजाहच्या खेळपट्टीवर चौकार-षटकारांच्या आतषबाजीसह थरार अनुभवायला मिळाला नाही तर नवलच.

By स्वदेश घाणेकर | Published: September 28, 2020 08:00 AM2020-09-28T08:00:00+5:302020-09-28T08:00:06+5:30

whatsapp join usJoin us
RR vs KXIP : Can someone please share with me what exactly this gentleman Sanju Samson’s daily diet is..?, Anand Mahindra tweet goes viral | RR vs KXIP Latest News : संजू सॅमसनचा डाएट प्लान कुणी मला सांगेल का? आनंद महिंद्रा यांचं ट्विट व्हायरल

RR vs KXIP Latest News : संजू सॅमसनचा डाएट प्लान कुणी मला सांगेल का? आनंद महिंद्रा यांचं ट्विट व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

RR vs KXIP Latest News : Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab)  यांच्यातल्या सामना रोमहर्षक झाला. KXIPच्या 223 धावांचे आव्हान RRला पेलवणार नाही, असेच वाटत होते. पण, शारजाहच्या खेळपट्टीवर चौकार-षटकारांच्या आतषबाजीसह थरार अनुभवायला मिळाला नाही तर नवलच. राजस्थान रॉयल्सनं ( RR) 224 धावांचे लक्ष्य पार करून इतिहास रचला.  या सामन्यात 85 धावा करणाऱ्या संजू सॅमसनला मॅन ऑफ दी मॅचच्या पुरस्कारानं गौरविण्यात आलं. सॅमसनची फटकेबाजी पाहून आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आनंद महिंद्रा (anand mahindra) यांनी केलेलं ट्विट व्हायरल झालं आहे. 

मयांक अग्रवालचे ( Mayank Agarwal) IPL मधील पहिले शतक अन् लोकेश राहुलचा ( KL Rahul) सातत्यपूर्ण खेळ याच्या जोरावर KXIPनं 20 षटकांत 2 बाद 223 धावांचा डोंगर उभा केला. मयांक अग्रवालनं ( Mayank Agarwal) 50 चेंडूंत 10 चौकार व 7 षटकारांसह 106 धावा चोपल्या. लोकेश राहुलने ( KL Rahul) 54 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 69 धावा केल्या. मयांक व लोकेश यांनी 183 धावांची भागीदारी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना  राजस्थान रॉयल्सकडून ( RR) सडेतोड उत्तर मिळाले. स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) आणि संजू सॅमसननं ( Sanju Samson) यांनीही षटकारांचा पाऊस पाडला. कर्णधार स्टीव्ह स्मिथ व संजू सॅमसन यांनी फटकेबाजी केली. स्मिथनं 27 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांसह 50 धावा केल्या. सॅमसन 42 चेंडूंत 4 चौकार व 7 षटकार करून 85 धावांवर माघारी परतला.  

राजस्थान रॉयल्सनं इतिहास रचला; स्वतःच्याच नावावरील विक्रम मोडला 

Video : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible!


RRच्या हातून सामना निसटला असेच वाटले, परंतु राहुल टेवाटियानं ( Rahul Tewatia) शेल्डन कॉट्रेलनं टाकलेल्या 18व्या षटकात 30 धावा चोपल्या. राहुल टेवाटियानं 31 चेंडूंत 7 षटकारांसह 53 धावा करताना राजस्थानचा विजय पक्का केला.जोफ्रा आर्चरने ( Jofra Archer) शमीला दोन खणखणीत षटकार खेचले. टॉम कुरनने चौकार मारून RRचा विजय पक्का केला. RRने 4 विकेट्स राखून सामना जिंकला. सामन्यात सॅमसनची फटकेबाजी पाहून आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलं. त्यांनी विचारलं, या संजू सॅमसन नामक व्यक्तीचा डाएट प्लान कुणी मला सांगेल का?

निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video 

मयांक अग्रवाल-लोकेश राहुल यांची आतषबाजी, पण अवघ्या 2 धावांनी हुकला भीमपराक्रम 


किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे

मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम 

KL Rahulनं मिळवला पहिला मान, 204च्या सरासरीनं चोपल्यात धावा 

रियान परागची सुपर डाईव्ह; RRसाठी अडवल्या 5 धावा, Video

Web Title: RR vs KXIP : Can someone please share with me what exactly this gentleman Sanju Samson’s daily diet is..?, Anand Mahindra tweet goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.