RR vs KXIP Latest News : Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab)  यांच्यातल्या सामना रोमहर्षक झाला. KXIPच्या 223 धावांचे आव्हान RRला पेलवणार नाही, असेच वाटत होते. पण, शारजाहच्या खेळपट्टीवर चौकार-षटकारांच्या आतषबाजीसह थरार अनुभवायला मिळाला नाही तर नवलच. राजस्थान रॉयल्सनं ( RR) 224 धावांचे लक्ष्य पार करून इतिहास रचला.  

राजस्थान रॉयल्सनं इतिहास रचला; स्वतःच्याच नावावरील विक्रम मोडला 

Video : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible!

मयांक अग्रवालचे ( Mayank Agarwal) IPL मधील पहिले शतक अन् लोकेश राहुलचा ( KL Rahul) सातत्यपूर्ण खेळ याच्या जोरावर KXIPनं 20 षटकांत 2 बाद 223 धावांचा डोंगर उभा केला. मयांक अग्रवालनं ( Mayank Agarwal) 50 चेंडूंत 10 चौकार व 7 षटकारांसह 106 धावा चोपल्या. लोकेश राहुलने ( KL Rahul) 54 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 69 धावा केल्या. मयांक व लोकेश यांनी 183 धावांची भागीदारी केली. स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) आणि संजू सॅमसननं ( Sanju Samson) यांनीही षटकारांचा पाऊस पाडला. स्मिथनं 27 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांसह 50 धावा केल्या. सॅमसन 42 चेंडूंत 4 चौकार व 7 षटकार करून 85 धावांवर माघारी परतला.  

निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video 

मयांक अग्रवाल-लोकेश राहुल यांची आतषबाजी, पण अवघ्या 2 धावांनी हुकला भीमपराक्रम 

 RRच्या हातून सामना निसटला असेच वाटले, परंतु राहुल टेवाटियानं ( Rahul Tewatia) शेल्डन कॉट्रेलनं टाकलेल्या 18व्या षटकात 30 धावा चोपल्या. राहुल टेवाटियानं 31 चेंडूंत 7 षटकारांसह 53 धावा करताना राजस्थानचा विजय पक्का केला.जोफ्रा आर्चरने ( Jofra Archer) शमीला दोन खणखणीत षटकार खेचले. टॉम कुरनने चौकार मारून RRचा विजय पक्का केला. RRने 4 विकेट्स राखून सामना जिंकला.   

IPL 2020 Point Table
किंग्स इलेव्हन पंजाब ( KXIP) वरील विजयानंतर राजस्थान रॉयल्सनं ( RR) चार गुणांसह गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. दिल्ली कॅपिटल्स ( DC) +1.10 नेट रनरेटनुसार अव्वल स्थानी आहे. 

Orange Cap 2020
ऑरेंज कॅपच्या अर्थात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या ( KXIP) दोन खेळाडूंमध्ये काँटे की टक्कर आहे. आजच्या सामन्यातील शतकवीर मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal) तीन सामन्यांत 221 धावांसह दुसऱ्या स्थानी आहे. लोकेश राहुल ( KL Rahul) अवघ्या एका धावेनं अव्वल स्थानी आहे.


Purple Cap 2020
पर्पल कॅप अर्थात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत मोहम्मद शमी ( 7 बळी) अव्वल स्थानी आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कागिसो रबाडा व चेन्नई सुपर किंग्सचा सॅम कुरन प्रत्येकी पाच विकेट्ससह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत.

किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे

मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम 

KL Rahulनं मिळवला पहिला मान, 204च्या सरासरीनं चोपल्यात धावा 

रियान परागची सुपर डाईव्ह; RRसाठी अडवल्या 5 धावा, Video

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2020: Updated points table, orange cap, purple cap standings after RR vs KXIP match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.