RR vs KXIP Latest News : KL Rahulनं मिळवला पहिला मान, 204च्या सरासरीनं चोपल्यात धावा

RR vs KXIP Latest News :लोकेश राहुल ( KL Rahul) आणि मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal) यांनी KXIPला दमदार सुरुवात करून दिली. 

By स्वदेश घाणेकर | Published: September 27, 2020 08:34 PM2020-09-27T20:34:57+5:302020-09-27T20:35:50+5:30

whatsapp join usJoin us
RR vs KXIP Latest News : KL Rahul becomes first batsman to complete 200 runs in IPL 2020 at an average of 204 | RR vs KXIP Latest News : KL Rahulनं मिळवला पहिला मान, 204च्या सरासरीनं चोपल्यात धावा

RR vs KXIP Latest News : KL Rahulनं मिळवला पहिला मान, 204च्या सरासरीनं चोपल्यात धावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

RR vs KXIP Latest News : Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) हे दोन तगडे संघ भिडत आहेत. RRकर्णधार स्टीव्ह स्मिथ ( Steven Smith)ने नाणेफेक जिंकून KXIPला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. लोकेश राहुल ( KL Rahul) आणि मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal) यांनी KXIPला दमदार सुरुवात करून दिली. RR vs KXIP Latest News & Live Score

किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे

IPL 2020मधील 'Daddy Army'! DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो

IPL 2020 ची ट्रॉफी रोज स्टेडियमवर कशी व कोण आणतं; पाहा खास Video

जयदेव उनाडकटनं टाकलेल्या तिसऱ्या षटकात मयांकने खणखणीत षटकार व चौकार खेचला. त्यानंतर स्टीव्ह स्मिथनं चौथ्या षटकात जोफ्रा आर्चरला ( Jofra Archer) पाचारण केले. लोकेश राहुलनं पहिल्या तीन चेंडूंत सलग चौकार खेचून आर्चरचे स्वागत केले. या दोघांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये 60 धावा चोपल्या. यंदाच्या IPL 2020मधील ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली. RR vs KXIP Latest News & Live Score

सातव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर श्रेयस गोपाळच्या गोलंदाजीवर मयांकनं खणखणीत फटका मारला. तो जवळपास षटकारच होता, परंतु रियान परागनं अप्रतिमरित्या तो अडवला आणि KXIPला एका धावेवरच समाधान मानावे लागले. या दोघांनी 8 षटकांत 86 धावा चोपल्या. मयांकने खणखणीत षटकार खेचून 26 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या अर्धशतकी खेळीत 5 षटकार व 4 चौकारांचा समावेश आहे. मयांक एका बाजूने RRच्या गोलंदाजांची पीसे काढत असताना राहुल संयमी खेळी करत त्याला योग्य साथ देत होता. या दोघांनी पहिल्या दहा षटकांत बिनबाद 110 धावा चोपल्या. IPL2020मधील ही पहिली शतकी भागीदारी ठरली. RR vs KXIP Latest News & Live Score

लोकेश राहुलनंही 35 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. IPL 2020त दोनशे धावा करणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा मान लोकेश राहुलनं पटकावला. त्यानं 3 सामन्यांत 204च्या सरासरीनं दोनशे + धावा केल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध नाबाद 132 ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्यापाठोपाठ मयांकनेही दोनशे धावांचा पल्ला पार केला. त्यानं 101च्या सरासरीनं धावा केल्या आहेत.RR vs KXIP Latest News & Live Score

Web Title: RR vs KXIP Latest News : KL Rahul becomes first batsman to complete 200 runs in IPL 2020 at an average of 204

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.