राहुल टेवाटियाचे एका षटकात पाच खणखणीत Six; ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी, Video 

RR vs KXIP Latest News : IPLमध्ये सर्वाधिक लक्ष्याचा पाठलाग करण्याचा स्वतःचाच विक्रम आज RRनं मोडला. RRनं किंग्स इलेव्हन पंजाबवर ( KXIP) 4 विकेट्स राखून विजय मिळला.

By स्वदेश घाणेकर | Published: September 28, 2020 07:45 AM2020-09-28T07:45:00+5:302020-09-28T07:45:01+5:30

whatsapp join usJoin us
RR vs KXIP Latest News : Rahul Tewatia hit five sixes in Sheldon cottrell one over, equal Chris Gayle record, Watch Video | राहुल टेवाटियाचे एका षटकात पाच खणखणीत Six; ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी, Video 

राहुल टेवाटियाचे एका षटकात पाच खणखणीत Six; ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देKXIPनं 20 षटकांत 2 बाद 223 धावांचा डोंगर उभा केला. मयांक व लोकेश यांनी 183 धावांची भागीदारी केलीराजस्थान रॉयल्सकडून ( RR) सडेतोड उत्तर

RR vs KXIP Latest News : Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab)  यांच्यातल्या सामना रोमहर्षक झाला. KXIPच्या 223 धावांचे आव्हान RRला पेलवणार नाही, असेच वाटत होते. पण, शारजाहच्या खेळपट्टीवर चौकार-षटकारांच्या आतषबाजीसह थरार अनुभवायला मिळाला नाही तर नवलच. राजस्थान रॉयल्सनं ( RR) 224 धावांचे लक्ष्य पार करून इतिहास रचला. IPLमध्ये सर्वाधिक लक्ष्याचा पाठलाग करण्याचा स्वतःचाच विक्रम आज RRनं मोडला. RRनं किंग्स इलेव्हन पंजाबवर ( KXIP) 4 विकेट्स राखून विजय मिळला. 

राजस्थान रॉयल्सनं इतिहास रचला; स्वतःच्याच नावावरील विक्रम मोडला 

Video : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible!

मयांक अग्रवालचे ( Mayank Agarwal) IPL मधील पहिले शतक अन् लोकेश राहुलचा ( KL Rahul) सातत्यपूर्ण खेळ याच्या जोरावर KXIPनं 20 षटकांत 2 बाद 223 धावांचा डोंगर उभा केला. मयांक अग्रवालनं ( Mayank Agarwal) 50 चेंडूंत 10 चौकार व 7 षटकारांसह 106 धावा चोपल्या. लोकेश राहुलने ( KL Rahul) 54 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 69 धावा केल्या. मयांक व लोकेश यांनी 183 धावांची भागीदारी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना  राजस्थान रॉयल्सकडून ( RR) सडेतोड उत्तर मिळाले. स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) आणि संजू सॅमसननं ( Sanju Samson) यांनीही षटकारांचा पाऊस पाडला. कर्णधार स्टीव्ह स्मिथ व संजू सॅमसन यांनी फटकेबाजी केली. स्मिथनं 27 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांसह 50 धावा केल्या. सॅमसन 42 चेंडूंत 4 चौकार व 7 षटकार करून 85 धावांवर माघारी परतला.  


RRच्या हातून सामना निसटला असेच वाटले, परंतु राहुल टेवाटियानं ( Rahul Tewatia) शेल्डन कॉट्रेलनं टाकलेल्या 18व्या षटकाच्या पहिल्या चार चेंडूवंर चार खणखणीत षटकार खेचून सामना 14 चेंडूंत 27 धावा असा चुरशीचा बनवला. राहुलनं 18व्या षटकात पाच षटकारांसह 30 धावा चोपल्या. 12 चेंडू 21 धावांची गरज असताना पुन्हा एकदा शमीनं 19व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर RRला धक्का दिला. रॉबीन उथप्पा 9 धावांवर बाद झाला. पण, जोफ्रा आर्चरने ( Jofra Archer) शमीला दोन खणखणीत षटकार खेचले आणि सामना पुन्हा राजस्थान रॉयल्सच्या बाजूनं झुकवला. राहुल टेवाटियानं 31 चेंडूंत 7 षटकारांसह 53 धावा करताना राजस्थानचा विजय पक्का केला.  टॉम कुरनने चौकार मारून RRचा विजय पक्का केला. RRने 4 विकेट्स राखून सामना जिंकला.   

निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video 

मयांक अग्रवाल-लोकेश राहुल यांची आतषबाजी, पण अवघ्या 2 धावांनी हुकला भीमपराक्रम 

ख्रिस गेल ( Chris Gayle) नंतर IPLमध्ये एका षटकात पाच Six मारमारा राहुल टेवाटिया हा पहिलाच खेळाडू ठरला.

पाहा राहुल टेवाटियाची मॅच विनिंग खेळी....
 

किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे

मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम 

KL Rahulनं मिळवला पहिला मान, 204च्या सरासरीनं चोपल्यात धावा 

रियान परागची सुपर डाईव्ह; RRसाठी अडवल्या 5 धावा, Video

 

Web Title: RR vs KXIP Latest News : Rahul Tewatia hit five sixes in Sheldon cottrell one over, equal Chris Gayle record, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.