Join us  

IPL 2020 Auction Date : कोलकातात होणार आयपीएल 2020चा लिलाव, जाणून घ्या खेळाडूंचा भाव, वेळ अन् सर्वकाही

IPL 2020 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी येत्या 19 डिसेंबरला लिलाव होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 1:14 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी येत्या 19 डिसेंबरला लिलाव होणार आहे. या लिलावासाठी 971 खेळाडूंनी नावांची नोंदणी केली होती, परंतु आठ संघांनी छाननी केल्यानंतर केवळ 332 खेळाडू लिलावाला सामोरे जाणार आहेत. आयपीएल आयोजकांनी शुक्रवारी याबाबतची अधिकृत घोषणा केली. या यादित 186 भारतीय, 143 परदेशी आणि 3 संलग्न देशांतील खेळाडूंचा समावेश आहे. 

24 नव्या खेळाडूंचा समावेश असून यात वेस्ट इंडिजडा केस्रीक विलियम्स, बांगलादेशचा कर्णधार मुश्फीकर रहीम आणि ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झम्पा यांचा समावेश आहे. याशिवाय सरे संघाचा 21 वर्षीय फलंदाज विल जॅक्स याची एन्ट्री लक्षवेधी ठरत आहे. जॅक्सनं संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या टी 10 सामन्यात लँकरशायरविरुद्ध 25 चेंडूंत शतक ठोकून सर्वांचे लक्ष वेधले होते. 332 खेळाडूंपैकी केवळ 73 खेळाडूंची निवड होणार असून त्यात 29 परदेशी खेळाडू असणार आहेत.

कोणीची किती मुळ किंमत2 कोटीः पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया), जोश हेझलवूड ( ऑस्ट्रेलिया), ख्रिस लीन ( ऑस्ट्रेलिया), मिचल मार्श ( ऑस्ट्रेलिया), ग्लेन मॅक्सवेल ( ऑस्ट्रेलिया), डेल स्टेन ( दक्षिण आफ्रिका), अँजेलो मॅथ्यूज ( श्रीलंका).

1.5 कोटी मुळ किंमत असलेल्या खेळाडूंमध्ये  रॉबीन उथप्पा या एकमेव भारतीय खेळाडूनं स्थान पटकावले आहे. त्याच्याशिवाय या गटात  शॉन मार्श (ऑस्ट्रेलिया), केन रिचर्डसन ( ऑस्ट्रेलिया), इयॉन मॉर्गन ( इंग्लंड), जेसन रॉय ( इंग्लंड), ख्रिस वोक्स ( इंग्लंड), डेव्हिड विली (इंग्लंड), ख्रिस मॉरिस ( दक्षिण आफ्रिका), कायले अबॉट ( दक्षिण आफ्रिका) यांचा समावेश आहे. यांच्यासह पियूष चावला, युसूफ पठाण आणि जयदेव उनाडकट यांना 1 कोटी  मुळ किंमतीच्या गटात स्थान मिळाले आहे.

मुळ किमतींची गटवारीमुळ किंमत     एकूण    भारतीय    परदेशी2 कोटी        7    0    71.5 कोटी        10    1    91 कोटी        23    3    2075 लाख        16    0    1650 लाख        78    9    69

अनकॅप खेळाडू40 लाख        7    1    6    30 लाख        8    5    320 लाख        183    167    16

किती बजेट मध्ये किती खेळाडू

वेळ ः दुपारी 3.30 वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण ः Star Sports 1 Hindi/1 HD Hindi, Star Sports First, 1 Tamil, 1 Telugu, 1 Kannada, 1 Bangla

 

IPL Auction 2020 : युवा नव्हे, तर वयस्कर खेळाडूही खाणार भाव!

IPL Auction 2020: परदेशी खेळाडू भाव खाणार, जाणून घ्या कोणाची किती मूळ किंमत...

विराट कोहलीची चिंता मिटली; IPL 2020साठी सलामीला मिळाला सक्षम पर्याय

IPL 2020 Players List : आयपीएलमधल्या कोणत्या खेळाडूंना संघात ठेवले कायम, जाणून घ्या...

IPL 2020 : सर्व आठ संघांची 'बजेट' सावरताना होणार तारांबळ; जाणून घ्या कोणाकडे किती संख्याबळ!  

IPL 2020: पुढील मोसमासाठी संघांनी केले अनेक दिग्गजांना रिलीज; पाहूया संपूर्ण यादी! 

IPL 2020 : आयपीएलच्या पुढील मोसमात संघ संख्या वाढणार; पाहा कोणाची लॉटरी लागणार

टॅग्स :आयपीएल लिलाव 2020आयपीएल 2020मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसनरायझर्स हैदराबादकोलकाता नाईट रायडर्सदिल्ली कॅपिटल्सराजस्थान रॉयल्सकिंग्ज इलेव्हन पंजाब