ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी भारताचा कॅप्टन ठरला? हार्दिक नव्हे तर BCCIची दुसऱ्याच खेळाडूला पसंती

T20 World Cup 2024 - वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ पुढल्या वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीला लागला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 05:31 PM2023-11-28T17:31:32+5:302023-11-28T17:32:46+5:30

whatsapp join usJoin us
India's captain for the T20 World Cup 2024 decided? BCCI prefers the name of Rohit Sharma and not Hardik Pandya | ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी भारताचा कॅप्टन ठरला? हार्दिक नव्हे तर BCCIची दुसऱ्याच खेळाडूला पसंती

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी भारताचा कॅप्टन ठरला? हार्दिक नव्हे तर BCCIची दुसऱ्याच खेळाडूला पसंती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2024 - वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ पुढल्या वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीला लागला आहे. अमेरिका व वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाने २०२२ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर तयारी सुरू केली होती. त्याचाच एक भाग म्हणून हार्दिक पांड्याकडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोपवले गेले होते. आयर्लंड दौऱ्यापासून सुरू झालेला हार्दिकचा कॅप्टन्सीचा प्रवास ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ पर्यंत राहिल, अशी जोरदार चर्चा होती. पण, आता त्यात ट्विस्ट आला आहे. 

ट्वेंट-२० वर्ल्ड कप २०२४मधील एकोणीसावा संघ ठरला, एका जागेसाठी ३ संघांमध्ये कडवी टक्कर


वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमधील पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा खूपच निराश झाला होता आणि या काळात रोहितने सोशल मीडियापासून पूर्ण ब्रेकही घेतला होता. रोहितचा हा शेवटचा वर्ल्ड कप आहे, त्यामुळे तो कर्णधारपदावरून पायउतार होऊ शकतो, असेही अनेकांनी सांगितले. पण आता त्याच्या कर्णधारपदाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. बीसीसीआय रोहितला कर्णधारपदावरून हटवू इच्छित नाही, असे अपडेट समोर येत आहेत. बोर्डाला रोहितला वेळ द्यायचा आहे आणि २०२४च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघआचे कर्णधारपदही द्यायचे आहे.  


रोहित आणि विराट कोहली यांनी गेल्या वर्षीच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीपासून एकही ट्वेंटी-२० सामना खेळलेला नाही. २०२३च्या वन डे वर्ल्ड कपची तयारी डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी ट्वेंटी-२० फॉरमॅटपासून दुरावा ठेवला होता. या दोघांनी वन डे वर्ल्ड कप गाजवला. रोहित ३६ वर्षांचा असला तरी पॉवरप्लेमध्ये त्याची आक्रमक फलंदाजी ट्वेंटी-२०साठी फायदेशीर ठरू शकते. अशा स्थितीत रोहित पुढील वर्षी होणारा वर्ल्ड कप खेळावा एवढाच बोर्ड आणि निवड समितीचा प्रयत्न आहे. ओपनिंगमध्ये गिल आणि रोहित पूर्णपणे सेटल झाल्याचंही बोर्डाचं मत आहे. 


गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये ओपनिंग केली, तर त्यांच्याकडे फारसा अनुभव नाही. त्यामुळे रोहितसाठी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणे महत्त्वाचे आहे.  दक्षिण आफ्रिका दौऱ्यात रोहित पुनरागमन करणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र तो वन डे मालिकेत भाग घेणार की नाही याबाबत सध्या माहिती नाही. पण रोहित दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. वर्ल्ड कपपूर्वी भारतीय संघाकडे तयारीसाठी ११ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामने आहेत, त्यापैकी पाच ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहेत. त्यात रोहित, विराटसह अनेक सीनियर खेळाडू सहभागी झालेले नाहीत. 

हार्दिक पांड्याला पुन्हा संघात घेणं मुंबई इंडियन्सला फायद्याचं ठरेल का?

हो (1712 votes)
नाही (1403 votes)

Total Votes: 3115

VOTEBack to voteView Results


 

Web Title: India's captain for the T20 World Cup 2024 decided? BCCI prefers the name of Rohit Sharma and not Hardik Pandya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.