India's Asia Cup 2025 Squad Announced : युएईच्या मैदानात रंगणाऱ्या आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी बीसीसीआयनं १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघात काही स्टार खेळाडूंना कमबॅकची संधी मिळाली आहे. तर दुसरीकडे काहींना टी-२० संघातून बाहेरच ठेवण्यात आले आहे. मुंबई येथील बीसीसीआयच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीनंतर निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आणि भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत संघाची घोषणा केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शुबमन गिलकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी
आशिया कप स्पर्धेसाठी शुबमन गिलचा संघात समावेश होणार का? यासंदर्भात मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. कसोटीवर फोकस करण्यासाठी त्याला या फॉर्मेटपासून दूर ठेवण्यात येईल, अशी चर्चा रंगली होती. पण आशिया कप स्पर्धेसाठीच्या संघात त्याचा संघात समावेश करण्यात आला असून त्याच्याकडे उप-कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याच्या अनुपस्थितीत अक्षर पटेल ही जबाबदारी बजावताना दिसला होता. याशिवाय जसप्रीत बुमराहचाही संघात समावेश करण्यात आला आहे. श्रेयस अय्यरसह इंग्लंजड दौरा गाजवणारा मोहम्मद सिराजला आशिया कप स्पर्धेसाठी संघात स्थान मिळालेले नाही.
आशिया कपसाठी असा आहे भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उप कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित राणा. रिंकू सिंह
राखीव खेळाडू- ध्रुव जुरेल, प्रसिद्ध कृष्णा, यशस्वी जयस्वाल, वॉशिंग्टन सुंदर आणि रियान पराग.