Join us

जब कोई बात बन जाए...! भारतीय क्रिकेटपटू बनली 'गायक', चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 13:01 IST

Open in App

भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. क्रिकेटशिवाय नवनवीन फोटो अन् रील्सच्या माध्यमातून ती चाहत्यांचे लक्ष वेधत असते. अलीकडेच झालेल्या बांगलादेशविरूद्धच्या वन डे मालिकेत जेमिमाने शानदार कामगिरी केली. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात तिने ८६ धावांसह ४ विकेट घेऊन भारतीय खेळाडूने सामनावीरचा पुरस्कार पटकावला होता. दरम्यान, आता जेमिमा तिने गायलेल्या एका गाण्यामुळे चर्चेत आहे. तिने बॉलिवूडचे प्रसिद्ध गाणं 'जब कोई बात बन जाए' गायले असून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. 

जेमिमाने हा व्हिडीओ शेअर करताच चाहत्यांसह भारतीय महिला क्रिकेटपटूंनी देखील कमेंटच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव केला. 'ओए होए धाकड गर्ल, नाइस व्हॉइस' असे म्हणत अष्टपैलू खेळाडू हरलीन देओलने आपल्या सहकारी खेळाडूचे कौतुक केले. 

जेमिमा रॉड्रिग्ज भारताकडून ट्वेंटी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. तिने ८३ सामन्यांमध्ये १० अर्धशतकी खेळींच्या जोरावर एकूण १७५१ धावा केल्या आहेत. या यादीत भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर (३१५२) पहिल्या स्थानी आहे, तर स्मृती मानधना (२८५४) आणि माजी कर्णधार मिताली राज (२३६४) धावांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. 

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघबॉलिवूडसोशल मीडिया
Open in App