भारतीय क्रिकेट संघ जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी रवाना होणार आहे. या दौऱ्याआधी रोहित शर्मानं निवृत्तीची घोषणा केली. टीम इंडियाच्या कसोटी संघाचा नवा कर्णधार कोण? हा मुद्दा चर्चेत असताना विराट कोहलीही कसोटीमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा रंगत आहे. दरम्यान आता आगामी इंग्लंड दौऱ्यासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आलीये. २३ मे रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
BCCI नं आखलाय खास प्लॅन
क्रिकबझच्या वृत्तानुसार, २३ मे रोजी होणाऱ्या कसोटी संघ निवडीआधी एक बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे समजते. बीसीसीआय निवड समितीची बैठक कुठं होणार ते अद्याप निश्चित नाही. या बैठकीत कोहलीसंदर्भात असल्याचे समोर येत आहे. बीसीसीआयने नव्या कसोटी कर्णधाराची ओळख करून देण्यासाठी पत्रकार परिषदेची योजनागी आखली आहे. याआधी पुढच्या काही दिवसांत इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारत 'अ' संघाची निवड केली जाणार आहे.
रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
कॅप्टन्सीच्या शर्यतीत शुबमन गिल आघाडीवर
इंग्लंड दौऱ्यासाठी रोहित शर्माच्या जागी कुणाची निवड होणार यासह भारतीय कसोटी संघाचा कर्णधाराच्या रुपात कुणाला पसंती मिळणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा उप कर्णधार होता. रोहितच्या अनुपस्थितीत त्याने भारतीय संघाचे नेतृत्वही केल्याचे पाहायला मिळाले. पण आगामी इंग्लंड दौऱ्यात शुबमन गिल हा कॅप्टन्सीच्या शर्यतीत बाजी मारेल, असे चित्र दिसते.
या चेहऱ्यांना मिळू शकते संधी
इंग्लंड दौऱ्यासाठी रोहित शर्माच्या जागी साई सुदर्शन सर्वात आघाडीवर दिसतोय. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सच्या ताफ्यातून खेळताना त्याने आपल्यातील क्षमता दाखवून दिलीये. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने धमक दाखवलीये. त्याला इंग्लंड दौऱ्यावर लॉटरी लागू शकते. याशिवाय करुण नायर, मयंक अग्रवाल आणि रजत पाटीदार या चेहऱ्यांचाही विचार केला जाऊ शकतो.