Join us

ही दोस्ती तुटायची नाय! "आम्ही कशाची चर्चा करतोय?", गिलच्या प्रश्नाला चाहत्यांची भन्नाट उत्तरं

shubman gill and ishan kishan friendship : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 18:41 IST

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, तिथे ७ जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळवली जाणार आहे. टप्प्याटप्प्याने टीम इंडियातील शिलेदार आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंग्लंडला रवाना होत होते. आयपीएल २०२३ मधील ऑरेंज कॅप विजेता शुबमन गिल आगामी सामन्याच्या तयारीत व्यग्र आहे. गिल आणि इशान किशनची मैत्री जगजाहीर आहे. अनेकदा आयपीएलदरम्यान आणि ड्रेसिंगरूममध्ये ते मस्ती करताना दिसले आहेत. इंग्लंडमध्ये सराव करतानाचा फोटो गिलने शेअर केला असून आम्ही कशाची चर्चा करतोय? अशी विचारणा केली आहे. गिलच्या या प्रश्नाला चाहत्यांनी देखील भन्नाट उत्तरं दिल्याचे दिसते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा अंतिम सामना ७ ते ११ जून या दरम्यान, लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. 

दरम्यान, मागील काही महिन्यांपासून शुबमन गिलचे नाव सारासोबत जोडले जात आहे. पण ही सारा तेंडुलकर की सारा अली खान आहे, अशी विचारणा चाहत्यांनी केली आहे. गिलने शेअर केलेल्या फोटोत पाहायला मिळते की, गिल आणि किशन सरावादरम्यान खांद्यावर हात टाकून बसले आहेत. हा फोटो शेअर करत गिलने म्हटले, "आम्ही कशाची चर्चा करत आहोत? ज्यामुळे मला हसू आवरत नाही." गिलने फनी इमोजी शेअर करत दुसरा फोटो पाहण्याचं आवाहन केलं.

चाहते साराच्या नावावरून गिलच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देत आहेत. 

WTC फायनलसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन, के.एस. भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट. 

राखीव खेळाडू - यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.  

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाशुभमन गिलइशान किशनभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
Open in App