Join us  

Rahul Dravid: आशिया चषकापूर्वी भारताला मोठा झटका; प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोना पॉझिटीव्ह

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 11:21 AM

Open in App

नवी दिल्ली : आशिया चषकापूर्वी (Asia Cup 2022) भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. कारण संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) कोरोना संक्रमित (Corona Positive) असल्याचे समोर आले आहे. लक्षणीय बाब म्हणजे भारतीय संघ आजच यूएईला रवाना होणार आहे. आशिया चषकाचा थरार २७ ऑगस्टपासून रंगणार असून पहिला सामना अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यामध्ये होणार आहे. तर रविवारी २८ ऑगस्ट रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. 

व्हीव्हीएस लक्ष्मण संघासोबत होणार रवाना 

राहुल द्रविड कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. अशा स्थितीत आशिया चषकात संघासोबत उपस्थित राहणे त्याच्यासाठी खूप कठीण जाऊ शकते. जोपर्यंत तो त्याची कोरोना चाचणी निगेटीव्ह येत नाही आणि तो तंदुरुस्त होत नाही तोपर्यंत तो संघासोबत जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत आशिया कपमध्ये राहुल द्रविडऐवजी व्हीव्हीएस लक्ष्मण संघासोबत रवाना होईल असे बोलले जात आहे.

आशिया चषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हूड्डा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.   

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघएशिया कपराहुल द्रविडबीसीसीआयकोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्याभारतीय क्रिकेट संघ
Open in App