आधी टीम इंडियाचा 'बाहुबली' शो! मग T20 World Cup ट्रॉफी घेऊन सूर्या थेट हनुमान मंदिरात (VIDEO)

टॉफीसह हनुमान मंदिरात पोहचला सूर्या, कोच गंभीर अन् जय शाह होते सोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 15:55 IST2026-03-09T15:44:32+5:302026-03-09T15:55:06+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Indian Team Captain Suryakumar Yadav And Coach Gautam Gambhir Went Hanuman Temple Ahmedabad With ICC Chairman Jay Shah After Winning T20 World Cup 2026 Watch | आधी टीम इंडियाचा 'बाहुबली' शो! मग T20 World Cup ट्रॉफी घेऊन सूर्या थेट हनुमान मंदिरात (VIDEO)

आधी टीम इंडियाचा 'बाहुबली' शो! मग T20 World Cup ट्रॉफी घेऊन सूर्या थेट हनुमान मंदिरात (VIDEO)

आयसीसी टी २० वर्ल्ड कप २०२६ च्या स्पर्धेतील दहाव्या हंगामात टीम इंडियाच्या धुरंधरांनी तिसऱ्यांदा ट्रॉफी उंचावत इतिहास रचला. ८ मार्चला अहमदाबादच्या मैदानात रंगलेल्या फायनलमध्ये भारतीय संघाने विक्रमी धावसंख्या उभारल्यावर न्यूझीलंडला ९६ धावांनी मात देत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आपली बादशाहत सिद्ध केली. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवरील ऐतिहासिक कामगिरीनंतर संघातील खेळाडूंनी केलेला जल्लोष,  देशभरातील चाहत्यांमधील उत्साह चर्चेत असताना आणखी एक खास व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. ट्रॉफी जिंकल्यावर सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर ICC अध्यक्षांसह थेट हनुमान मंदिरात पोहचल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येते. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

टॉफीसह हनुमान मंदिरात पोहचला सूर्या, कोच गंभीर अन् जय शाह होते सोबत

एएनआयने एक्स अकाउंटवरुन सूर्यकुमार यादवचा हनुमान मंदिरातील खास व्हिडिओ शेअर केला आहे. यात भारतीय कर्णधार ट्रॉफीसह अहमदाबाद स्थित हनुमान मंदिरात दर्शनासाठी पोहचल्याचे दिसते. यावेळी त्याच्यासोबत प्रशिक्षक गौतम गंभीर आणि आयसीसीचे अध्यक्ष जय शाह हे देखील होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

"कोच साब…किलर कॉम्बो"! ६०३ दिवसांनी इन्स्टावर परतला MS धोनी; गंभीरसंदर्भातील कमेंट व्हायरल

सलग दुसऱ्या विजयासह भारतीय संघाने रचला इतिहास

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून दाखवली. घरच्या मैदानात ट्रॉफीचा बचाव करण्याचा खास विक्रमही टीम इंडियाच्या नावे झाला. एवढेच नाही तर धोनी आणि रोहित शर्मानंतर सूर्यकुमार यादवने भारतीय संघाला तिसऱ्यांदा या स्पर्धेत जेतेपद मिळवून  देण्याचा पराक्रम केला आहे. आतापर्यंत अशी कामगिरी अन्य कोणत्याही संघाला जमलेली नाही.
 
भारतीय संघाचा 'बाहुबली' शो

 न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्ये नाणेफेक गमावल्यावर भारतीय संघावर पहिल्यांदा फलंदाजी करण्याची वेळ आली. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि ईशान किशनच्या स्फोटक फटकेबाजी आणि अखेरच्या षटकात शिवम दुबेनं दाखवलेल्या फलंदाजीतील ताकदीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित २० षटकात २५५ धावा करत किवींसमोर २५६ धावांचे विक्रमी टार्गेट सेट केले होते. टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील फायनलमधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ १५९ धावांत आटोपला.
 

Web Title : भारत ने टी20 विश्व कप जीता, ट्रॉफी के साथ हनुमान मंदिर पहुंचे सूर्य.

Web Summary : भारत ने न्यूजीलैंड को हराकर टी20 विश्व कप जीता। जीत के बाद, सूर्यकुमार यादव कोच गौतम गंभीर और आईसीसी अध्यक्ष जय शाह के साथ ट्रॉफी लेकर अहमदाबाद के हनुमान मंदिर दर्शन के लिए पहुंचे।

Web Title : India wins T20 World Cup, Surya visits Hanuman temple with trophy.

Web Summary : India clinched the T20 World Cup, defeating New Zealand. Following the victory, Suryakumar Yadav, along with coach Gautam Gambhir and ICC president Jay Shah, visited a Hanuman temple with the trophy in Ahmedabad to offer prayers.