आशिया कप नक्कीच जिंकू...! कर्णधार रो-हिटमॅननं व्यक्त केला विश्वास; ३० तारखेपासून थरार

Rohit Sharma on Asia Cup 2023 : आगामी आशिया चषकाची स्पर्धा जिंकू असा विश्वास भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 04:17 PM2023-08-23T16:17:31+5:302023-08-23T16:17:49+5:30

whatsapp join usJoin us
 Indian team captain Rohit Sharma has expressed his belief that they will win the Asia Cup 2023  | आशिया कप नक्कीच जिंकू...! कर्णधार रो-हिटमॅननं व्यक्त केला विश्वास; ३० तारखेपासून थरार

आशिया कप नक्कीच जिंकू...! कर्णधार रो-हिटमॅननं व्यक्त केला विश्वास; ३० तारखेपासून थरार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

asia cup 2023 : आगामी आशिया चषकाची स्पर्धा जिंकू असा विश्वास भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केला. विमानतळावर स्पॉट झालेल्या रोहितला आशिया चषकाबद्दल प्रश्न विचारला असता त्यानं हा विश्वास व्यक्त केला. ३० ऑगस्टपासून पाकिस्तान आणि श्रीलंकेत आशिया चषक खेळवला जाणार आहे. स्पर्धेतील सलामीचा साममा यजमान पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात पाकिस्तानातील मुल्तान येथे होणार आहे. तर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे २ सप्टेंबरला आमनेसामने असतील. 

सोमवारी अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. आशिया चषकातून लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर पुनरागमन करत आहेत. याशिवाय तिलक वर्माची सरप्राईज एन्ट्री झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान, भारतीय कर्णधाराला आशिया चषकाची आम्ही वाट पाहत आहोत असे विचारला असता रोहितने म्हटले, "होय, जितेंगे जितेंगे."

३० ऑगस्टपासून आशिया चषकाचा थरार रंगणार आहे, तर १९ सप्टेंबरला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. या स्पर्धेनंतर ५ ऑक्टोबरपासून भारतात बहुचर्चित वन डे विश्वचषकाला सुरूवात होईल. कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आशिया चषकात २ सप्टेंबर तर विश्वचषकात १४ ऑक्टोबरला आमनेसामने असतील. 

आशिया चषकासाठी भारतीय संघ - 
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा,  

 राखीव खेळाडू - संजू सॅमसन 

आशिया चषकाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे - 
३० ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान
३१ ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी
२ सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी
३ सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
४ सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी
५ सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर
९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी
१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी
१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला
१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला
१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला
१७ सप्टेंबर - फायनल

Web Title:  Indian team captain Rohit Sharma has expressed his belief that they will win the Asia Cup 2023 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.