Join us

Asia Cup 2023 : भारतीय संघ जाहीर होताच गंभीरचे एका दगडात दोन पक्षी; २ स्पिनर्ससाठी 'बॅटिंग'

team india squad asia cup 2023 : आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 14:01 IST

Open in App

नवी दिल्ली : आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर होताच जाणकारांसह माजी खेळाडू आपापली मतं मांडत आहेत. तिलक वर्माच्या सरप्राईज एन्ट्रीनं अनेकांचं लक्ष वेधलं. शिखर धवनला संधी न दिल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच टीम इंडियात कमीत कमी दोन फिरकीपटूंना संधी द्यायला हवी होती असं परखड मत गौतम गंभीरनं मांडलं आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी मोठ्या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. दुखापतीमुळं संघाबाहेर असलेल्या लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांचे संघात पुनरागमन झालं आहे. 

आशिया चषकासाठी संघ जाहीर झाल्यानंतर 'स्टार स्पोर्ट्स'शी बोलताना गंभीरनं म्हटलं, "निवडकर्त्यांनी चांगला संघ तयार केला आहे. पण, खेळपट्टीची स्थिती पाहता भारतीय संघात कमीत कमी आणखी दोन फिरकीपटू असायला हवे होते. युझवेंद्र चहल आणि रवी बिश्नोई यांना संधी दिली जाऊ शकली असती. कारण त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. मोहम्मद शमीला प्लेइंग इलेव्हनमधून विश्रांती देता आली असती अन् प्रसिद्ध कृष्णाला खेळवायला हवं. 

आशिया चषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा,  

 राखीव खेळाडू - संजू सॅमसन 

आशिया चषकाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे - ३० ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान३१ ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी२ सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी३ सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर४ सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी५ सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला१७ सप्टेंबर - फायनल

टॅग्स :एशिया कप 2022रोहित शर्माबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघगौतम गंभीर
Open in App