Join us

IND vs SA : रिंकू सिंगचं पदार्पण, ऋतुराजसोबत सलामीला कोण? कर्णधार राहुलनं केला खुलासा

Rinku Singh ODI Debut : रविवारपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला सुरूवात होत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 18:32 IST

Open in App

india vs south africa 1st odi : लोकेश राहुलच्या नेतृत्वात भारतीय संघ रविवारपासून दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वन डे मालिका खेळणार आहे. पहिल्या सामन्याच्या तोंडावर भारतीय कर्णधार लोकेश राहुलने पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केले. भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरूवात ट्वेंटी-२० मालिकेने झाली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने ट्वेंटी-२० मालिका खेळली. मात्र, आता लोकेश राहुलच्या नेतृत्वात भारत तीन सामन्यांची वन डे मालिका खेळत आहे.

भारतीय कर्णधाराने पत्रकार परिषदेत सांगितले की, संजू सॅमसन वन डेमध्ये मधल्या फळीत अर्थात पाच किंवा सहा नंबरला खेळेल. रिंकू सिंगला आगामी मालिकेत संधी दिली जाईल. मी स्वत: एक यष्टीरक्षक फलंदाज म्हणून प्रतिनिधित्व करेन. चौथ्या क्रमांकावर मला खेळण्यास संघ व्यवस्थापनाने हिरवा सिग्नल दिला आहे. खरं तर उद्याच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडसोबत सलामीला कोण येते हे पाहण्याजोगे असणार आहे. कारण कर्णधार राहुल मधल्या फळीत खेळताना दिसेल. 

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघ -लोकेश राहुल (कर्णधार), युझवेंद्र चहल, रिंकू सिंग, संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजित पाटीदार, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि दीपक चहर. 

वन डे मालिकेचे वेळापत्रक - 

  1. १७ डिसेंबर - जोहान्सबर्ग, दुपारी १.३० वाजल्यापासून
  2. १९ डिसेंबर - जीकबेर्हा, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून 
  3. २१ डिसेंबर - पर्ल, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून 
टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकालोकेश राहुलरिंकू सिंगभारतीय क्रिकेट संघसंजू सॅमसन