Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!

पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने घेतली २-१ अशी आघाडी, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 22:29 IST

Open in App

IND vs SA 3rd T20I :  हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील मैदानात रंगलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने पाहुण्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला २५ चेडू आणि ७ विकेट्सनी मात दिली. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. चंदीगड येथील मुल्लानपूरच्या मैदानात नाणेफेक गमावण्याचा सिलसिला खंडीत केल्यावर धर्मशालाच्या मैदानात  सलग दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादवनं नाणेफेक जिंकली आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात टॉस जिंकणाऱ्या संघाच्या पदरी पराभव आला होता. पण यावेळी तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून कर्णधाराने घेतलेला निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला अन् शेवटी टीम इंडियाने सामनाही जिंकला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अर्शदीप सिंग, हर्षित राणा यांनी गोलंदाजी वेळी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला धक्क्यावर धक्के दिले. त्यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्ती आणि कुलदीपनेही प्रत्येकी २-२ विकेट घेत जलदगती गोलंदांजाच्या बरोबरीनं कामगिरी करुन दाखवली. हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला फक्त ११७ धावांवर रोखले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाने १६ व्या षटकात ७ विकेट्स राखून विजय नोंदवला. पण माफक धावांचा पाठलाग करताना कोणताही दबाव नसताना कर्णधार सूर्यकुमार यादवसहशुभमन गिल पुन्हा अपयशी ठरले.

IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दिलेल्या माफक धावसंख्येचा पाठलाग करताना अभिषेक शर्मानं टीम इंडियाला धमाकेदार अंदाजात सुरुवात करून दिली. डावातील पहिल्या चेंडूवर षटकारासह खाते उघडणाऱ्या अभिषेक शर्मानं ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १८ चेंडूत ३५ धावांची खेळी केली. शुभमन गिल २८ चेंडू खेळला. पण पुन्हा तो २८ धावांवर अडखळला.  सूर्यकुमार यादवनं २ चौकार मारत माहोल निर्माण केला. पण मोठा फटका मारण्याच्या नादात तो एनिगडीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने ११ चेंडूत १२ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या तिलक वर्मानं ३४ चेंडूत नाबाद २५ धावा केल्या. शिवम दुबेनं षटकार आणि चौकार मारत १६ व्या षटकात मॅच संपवली.

English
हिंदी सारांश
Web Title : India beats South Africa in T20I, Surya and Gill fail.

Web Summary : India defeated South Africa, taking a 2-1 lead. Bowlers restricted South Africa to 117. Abhishek Sharma's quickfire 35 led the chase, while Tilak Varma remained unbeaten. Surya and Gill failed to perform well.
टॅग्स :दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाशुभमन गिलसूर्यकुमार यादवभारतीय क्रिकेट संघ