वनडे वर्ल्ड चॅम्पियन भारतीय महिला संघाचे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वेळापत्रक समोर आले आहे. यजमान दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी, यंदाच्या वर्षाच्या अखेरीस भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्धच्या मालिकांचे वेळापत्रक जाहीर केले. भारतीय महिला संघ या दौऱ्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसह एकमेव कसोटी सामनाही खेळणार आहे. हा सामना २० ते २३ डिसेंबर या कालावधीत गेबेर्हाच्या मैदानात नियोजित आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वनडे मालिकेतील तिन्ही सामने ICC महिला चॅम्पियनशिप अंतर्गत खेळले जातील. ही तीन सामन्यांची मालिका ९ ते १५ डिसेंबर दरम्यान रंगणार आहे. हे सामने पोटचेफस्ट्रूम, ब्लोमफॉन्टेन आणि केप टाउन येथे खेळवण्यात येणार आहेत.
BCCI चा 'मेगा प्लॅन'! ODI वर्ल्ड कपसाठी संभाव्य संघ ठरला; IPL मध्ये याच खेळाडूंवर असतील नजरा
६ डिसेंबरपासून भारताच्या दौऱ्याची सुरुवात
भारतीय महिला संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात ६ डिसेंबर रोजी होईल. त्या दिवशी भारतीय संघ बेनोनी येथे दक्षिण आफ्रिका इमर्जिंग संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांमध्ये आतापर्यंत एकूण ३ कसोटी सामने झाले असून दोन्ही संघ चौथ्या कसोटी सामन्यात समोरासमोर भिडणार आहेत.
ऑस्ट्रेलिया महिला संघाचाही दक्षिण आफ्रिका दौरा
भारतीय महिला संघाच्या दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलियन महिला संघ Australia women's national cricket team दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर येणार आहे. हा मल्टी-फॉरमॅट दौरा १८ मार्च ते ११ एप्रिल २०२७ दरम्यान होईल. या मालिकेत तीन टी-२०, तीन वनडे आणि एक कसोटी सामना खेळवला जाणार आहे. टी-२० सामने किम्बर्ली, बेनोनी आणि ईस्ट लंडन येथे होतील. त्यानंतर वनडे सामने गकेबेर्हा, पार्ल आणि डरबन येथे खेळले जातील.
भारतीय महिला संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक
- ६ डिसेंबर - सराव सामना, बेनोनी
- ९ डिसेंबर – पहिला वनडे, पोटचेफस्ट्रूम
- १२ डिसेंबर – दुसरा वनडे, ब्लोमफॉन्टेन
- १५ डिसेंबर – तिसरा वनडे, केप टाउन
- २० ते २३ डिसेंबर – एकमेव कसोटी, गकेबेर्हा