India Women vs Sri Lanka Women 5th T20I Live Streaming : भारत विरुद्ध श्रीलंका महिला संघातील पाचवा आणि अखेरचा टी-२० सामना मंगळवारी रंगणार असून, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया क्लीन स्वीपसाठी सज्ज झाली आहे. वर्षाचा शेवट दणक्यात करण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दुसरीकडे, चौथ्या सामन्यात कर्णधार चामरी अट्टापटू फॉर्ममध्ये परतल्याने श्रीलंका संघाला नवी उमेद मिळाली आहे. तिच्या जोरावर लंकेचा संघ क्लीन स्वीप टाळण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल.
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
घरच्या मैदानावर खेळताना भारतीय संघाने आगामी इंग्लंडमधील टी-२० वर्ल्ड कपसाठी आपण पूर्णपणे सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र, वनडेनंतर टी-२० मध्येही वर्ल्ड चॅम्पियन बनण्यासाठी फिल्डिंगमध्ये आणखी सुधारणा करण्याचे आव्हान भारतीय संघासमोर आहे.
बॅटिंग–बॉलिंग जबरदस्त; फिल्डिंगमध्ये अजूनही उणीव
या मालिकेत भारतीय गोलंदाजांनी सातत्यपूर्ण कामगिरी करत वर्चस्व राखले आहे. चौथ्या सामन्यात फलंदाजीनेही दमदार पुनरागमन केले. शेफाली वर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये असून तिने मागील तीन सामन्यांत १८५ च्या स्ट्राइक रेटने अर्धशतकी खेळी केली आहे.पहिल्या तीन सामन्यांत अपयशी ठरलेली स्मृती मानधना चौथ्या सामन्यात लयीत परतली असून तिने ४८ चेंडूत ८० धावांची झंझावाती खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर रिचा घोष हिनेही प्रभावी फलंदाजी केली आहे. गोलंदाजीत रेणुका सिंग, दीप्ती शर्मा आणि पदार्पणातच प्रभाव पाडणारी वैष्णवी शर्मा संघासाठी मोठी जमेची बाजू ठरली आहे. मात्र, फिल्डिंगमध्ये अजूनही सुधारणा आवश्यक आहे.
सामना कधी आणि कुठे?
- सामना: भारत विरुद्ध श्रीलंका, ५ वा महिला टी-२० सामना
- तारीख: मंगळवार, ३० डिसेंबर
- स्थळ: ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम
- वेळ: सायंकाळी ७.०० वाजता (टॉस -६.३० वा.)
थेट प्रक्षेपण
भारत विरुद्ध श्रीलंका ५ वा महिला टी-२० सामना Star Sports Network वर थेट पाहता येईल.
Web Summary : India Women aim for a clean sweep against Sri Lanka in the final T20I. Smriti Mandhana's return to form and Shafali Verma's explosive batting boost the team. While batting and bowling are strong, fielding improvements are needed. The match will be broadcast on Star Sports Network.
Web Summary : भारत महिला टीम का लक्ष्य श्रीलंका के खिलाफ अंतिम टी20I में क्लीन स्वीप करना है। स्मृति मंधाना की फॉर्म में वापसी और शेफाली वर्मा की विस्फोटक बल्लेबाजी टीम को बढ़ावा देती है। बल्लेबाजी और गेंदबाजी मजबूत है, लेकिन फील्डिंग में सुधार की जरूरत है। मैच स्टार स्पोर्ट्स नेटवर्क पर प्रसारित किया जाएगा।