Join us

IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट

पावसाच्या व्यत्ययामुळे सामना उशीरा सुरु झाला असला तरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 16:57 IST

Open in App

India Women vs South Africa Women Final :  महिला विश्वचषक स्पर्धेतील नवी मुंबईच्या मैदानात खेळवण्यात येणाऱ्या मेगा फायनलमध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टार्गेट सेट करणार आहे. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड हिने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना उशीरा सुरु झाला असला तरी षटकांची कपात न करता हा सामना खेळवण्यात येईल.

भारतीय महिला  प्लेइंग इलेव्हन

 शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेट किपर बॅटर), अमनजोत कौर, राधा यादव, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर.

दक्षिण आफ्रिका महिला  प्लेइंग इलेव्हन

 लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, ॲनेके बॉश, सुने लुस, मारिझान कॅप, सिनालो जाफ्ता (विकेट किपर बॅटर), ॲनेरी डेर्कसेन, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलुको म्लाबा.

 

English
हिंदी सारांश
Web Title : South Africa wins toss, India to set target in final.

Web Summary : South Africa won the toss and chose to bowl first in the Women's World Cup final against India. Despite a delayed start due to rain, the match will proceed without reducing the number of overs. India's and South Africa's playing elevens are announced.
टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहरनमप्रीत कौरस्मृती मानधना