India Women vs South Africa Women Final : महिला विश्वचषक स्पर्धेतील नवी मुंबईच्या मैदानात खेळवण्यात येणाऱ्या मेगा फायनलमध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टार्गेट सेट करणार आहे. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड हिने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना उशीरा सुरु झाला असला तरी षटकांची कपात न करता हा सामना खेळवण्यात येईल.
भारतीय महिला प्लेइंग इलेव्हन
शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेट किपर बॅटर), अमनजोत कौर, राधा यादव, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर.
दक्षिण आफ्रिका महिला प्लेइंग इलेव्हन
लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, ॲनेके बॉश, सुने लुस, मारिझान कॅप, सिनालो जाफ्ता (विकेट किपर बॅटर), ॲनेरी डेर्कसेन, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलुको म्लाबा.